वाघ वाचवा, पर्यावरण वाचवा…. इको-प्रो सह स्थानिक पर्यावरणप्रेमींचे वनक्षेत्रात निदर्शने…. वाचा काय आहे प्रकरण

चिमूर : जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पच्या उत्तरेकडील व्याघ्र-वन्यप्राणी भ्रमणमार्गमध्ये बंदर येथे कोळसा खाण प्रस्तावित आहे. खाण झाल्यास वाघासह अन्य वन्यप्राणी आणि पर्यावरण नष्ट होईल. त्यामुळे कोळसा खाणीला विरोध करण्यासाठी चंद्रपूरच्या इको-प्रो या संस्थेने वनक्षेत्रात निदर्शने केली. यासाठी त्यांनी २३० किमीची परिक्रमा मोटारसायकल रॅली काढली. यात चिमूर तालुक्यातील स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

◆ जंगल आणि त्यातील वन्यप्राणी यांच्या सुरक्षितेसाठी इको-प्रो चे पदाधिकारी नेहमी आक्रमक असतात. सुमारे दहा वर्षांपूर्वी ताडोबा लगतच्या लोहारा येथे प्रस्तावित कोळसा खाणला विरोध करण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. त्यानंतर केंद्र सरकारने अदानी समूहाला दिलेली लोहारा कोळसा खाण रद्द केली. आता पुन्हा बंदर कोळसा खाणचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ही खाण झाल्यास वाघ आणि अन्य वन्यप्राणी यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.

सोबतच पर्यावरणाचा ऱ्हास होईल. त्यामुळे खाण पट्ट्याच्या लीलावास विरोध म्हणून सोमवारला इको-प्रो तर्फे संपूर्ण ताडोबा प्रकल्पास परिक्रमा करीत मोटरसायकल रैली काढण्यात आली. यापूर्वीसुद्धा सदर वनक्षेत्रात कोळसा खान करीता खाजगी कंपनीना खाण पट्टा देण्यात आलेला होता. मात्र वन-वन्यजीव संवर्धन करिता धोकादायक असल्याने सदर प्रकल्पास सर्वस्तरातून विरोध झालेला होता.

बंदर कोल ब्लॉक कोल इंडियाच्या लिलाव यादीतून वगळण्याच्या मागणीकरिता इको-प्रो तर्फे यापूर्वी मूक निदर्शन व आता इको-प्रो च्या ४० सदस्यांनी ताडोबा सभोवताल २३० किमी परिक्रमा मोटरसायकलने पूर्ण करीत कॉरिडोर ‘वाचवा, वाघ वाचवा, जंगल वाचवा’ चा संदेश दिला. सोबत या दरम्यान प्रस्तावित कोळसा खानीच्या वनक्षेत्रात जाऊन इको-प्रो सदस्यांनी बंडु धोतरे यांच्या नेतृत्वात स्थानिक वन्यजीवप्रेमीसोबत जोरदार निदर्शने केली.

◆ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तर दिशेस बफर क्षेत्रास लागून असलेल्या वनक्षेत्रतिल बंदर कोल ब्लॉक कोल इंडिया तर्फे लिलाव करण्यात येणाऱ्या ४१ कोल ब्लॉक अंतर्गत या कोल ब्लॉकचा समावेश आहे.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेली वाघाची संख्या, आवश्यक व्याघ्र अधिवास ची कमतरता, दिवासागणिक वाढत असलेला जिल्ह्यातील वाघ-मानव संघर्ष, व्याघ्र कॉरिडोर म्हणजेच वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्ग अधिक सुरक्षित करीत संवर्धन करण्याची गरज असताना अशातच सदर कॉल ब्लॉक चा लिलाव म्हणजे ताडोबा प्रकल्प व व्याघ्र संवर्धनासाठी धोक्याची घंटा आहे, यामुळे इको-प्रो पर्यावरणप्रेमी मधे तीव्र नाराजी आहे.

‘बंदर कोल ब्लॉक’ कोल इंडियाच्या लिलाव यादीतून वगळण्याची मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी इको-प्रो चे संस्थेचे सदस्य तसेच चिमूर तालुक्यातील वन्यजीव प्रेमी तरुण पर्यावरणवादी मंडळचे अमोद गौरकर, वीरेंद्र हिंगे, पर्यावरण संवर्धन समितीचे कवडू लोहकरे, पंचायत समिती सदस्य अजहर शेख व इको-प्रो चे नितिन रामटेके, अब्दुल जावेद, धर्मेंद्र लुनावत, सुधीर देव, वैभव मडावी, सुमित कोहले आदि सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here