दानापुर मध्ये सरपंच ईश्वर चिठ्ठीने…

दानापुर – गोपाल विरघट

ग्रामपंचायत निवडणूक दि. ११/०२/२१ गुरूवारला पार पडली, यामध्ये वंचित बहुजन आघाडी व शिवसेना युतीच्या सौ. सपना धम्मपाल वाकोडे ह्या ईश्वर चिठ्ठीने निवडून आल्या ग्रामपंचायत वर बहुजन विचारवादी गटाचा झेंडा फडकला तालुक्यातील क्रमांक दोनची सर्वात मोठी दानापूर ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी ही ग्रामपंचायत गेल्या पन्नास वर्षापासून प्रथमच एस सी राखीव (सर्वसाधारण) सरपंच म्हणून बहुमान मिळाला,

यामध्ये सौ.नेहा शांताराम माकोडे तर दुसरीकडून वंचित बहुजन आघाडीच्या सौ. सपना धम्मपाल वाकोडे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले दोन्ही उमेदवारांना ८/८ समान मते मिळाले व १ मत अवैद्य ठरल्याने कु.वैष्णवी गणेश घायल या मुलीकडुन ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली,

यामध्ये सौ. सपना धम्मपाल वाकोडे विजयी झाल्या तर उपसरपंच पदाकरिता गोपाल विखे विरुद्ध सागर ढगे होते, यावेळी सागर ढगे यांना नऊ मते तर गोपाल विखे आठ मते मिळाली यामध्ये सागर ढगे उपसरपंच म्हणून निवडून आले, विशेष म्हणजे दानापूर च्या ग्रामपंचायत सहभागात यावेळी सर्व नवीन चेहरे असल्याने दानापूर गावातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here