रामटेक – राजु कापसे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्पाच्या वतीने संत ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय महादुला येथे आज दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिन जनजागृती सप्ताह कार्यक्रम शासकीय नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.
रामटेकचे समतादूत राजेश राठोड यांनी प्रजासत्ताक दिनाची माहिती देऊन कागदी ध्वज परिसरात न टाकता शिक्षकांकडे जमा करावे व संविधानातील अकरा मूलभूत कर्तव्य याचे स्पष्टीकरण करून राष्ट्रीय कर्तव्याचे पालन सर्वांनी करावे असे संबोधित केले.

मौदा येथील समतादूत ओमप्रकाश डोले यांनी व दुर्योधन बगमारे यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका उषा ढेंगरे, शिक्षक संदीप उरकुडे, उमेश कडू, मंदा मोहोड, रंजना बागडे, शांता सोनटक्के, खुशाल मोहारे,
अनिल मसराम, आनंद शिंगाडे, सुनील वालदे, शेखर डहारे, शिरोडे ,लिपिक नितीन कुंटे व इतर कर्मचारी व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. सदर उपक्रमास प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले जिल्हा नागपूर यांचे मार्गदर्शन लाभले.