सफाळॆ पोलीसांकडून १०वीच्या परीक्षेत ९५% गुण मिळवणाऱ्या सानिकाचा सन्मान..!

सफाळे दिनांक 16 सप्टेंबर

पालघर तालुक्यातील मौजे-खडकोली येथील पोलीस पाटील श्री.शरद विठ्ठल सातवी यांची कन्या कुमारी. सानीका ही भगिनी समाज माध्यमिक विद्यालय,पालघर या शाळेत सन २०१९/२० या वर्षी इयत्ता “१०वि त शिक्षण घेत होती.

विशेष बाब म्हणजे,सदर विद्यार्थिनी “खडकोली” गावासारख्या अतिशय दुर्गम व आदीवासी बहुल लोकवस्ती असलेल्या भागात राहून तसेच तिची घरची आर्थिकस्थिती बेताची असून सुद्धा आणि शिक्षणाच्या दृष्टिकोणातुन कोणत्याही सोयी-सुविधा नसताना सुद्धा इयत्ता १०वीच्या परीक्षेत सानिकाने (९५%) गुण प्राप्त करुन घवघवित यश संपादन केल आहे.

सफाळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक, श्री.सुनील जाधव यांना सदर घटनेची माहीती मिळताच त्यांनी व्यक्तिशः तिच्या “खडकोली” येथील राहत्या घरी जाऊंन कुमारी “सानिका” हिची भेट घेतली. तिला पुष्पगुच्छ व भेट वस्तु देऊन तिचा गौरव केला. तसेच तिचे अभिनदंन करुन तीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, श्री.सुनील जाधव यांनी सानिकाला “MPSC ” व “UPSC” यासारख्या “स्पर्धा परीक्षा” बाबत मार्गदर्शन करुन भविष्यात “IAS” किंवा “IPS” अथवा “प्रथम श्रेणी” किंवा “द्वितीय श्रेणी” च्या दर्जाची एक “महिला अधिकारी” होण्याचे आवाहन केले.

त्या करीताही कोणत्याही गोष्टीची मदत लागल्यास निसंकोचपणे मदत मागावी अशी पोलीस पाटील यांना सूचना देखील केली. त्याच बरोबर आयुष्यात स्वतः “स्वावलंबी” व “यशस्वी” होईपर्यंत किमान “२१साव्या” वर्षापर्यन्त तरी मूलीने विवाह करू नये, असा साहेब यांनी “पोलीस पाटील” व त्यांच्या “कन्ये”ला सल्ला दिला.

सदर प्रसंगी सफाळॆ पोलीस ठाण्याचे शिपाई श्री. शिवपाल प्रधाने,पोलीस नाईक श्री.सचिन मोरे ईत्यादि कर्मचारी उपस्तिथित होते.उपस्थित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी केलेल्या सत्कारासाठी व मार्गदर्शनासाठी कुमारी सानिका व तिच्या कुटुंबीयांनी मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here