सांगली । बेदाणा आणि खजुराची चोरी करणाऱ्या एकास अटक…सात लाख 13 हजार आजचा मुद्देमाल जप्त…

सांगली प्रतिनिधी :– ज्योती मोरे.
महागडा बेदाणा आणि खजुराची चोरी करणाऱ्या एका इसमास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 7 लाख 13 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार हे मिरज विभागात पेट्रोलिंग करत असताना संतोष गळवे व संदीप पाटील यांना त्यांच्या बातमीदारांनी कडून प्रशांत शिवपुजन सिंग वय 46 राहणार गिरिजा बंगला प्लॉट नंबर 43 सिद्धिविनायक सोसायटी विजयनगर सांगली या इसमाने बेदाणा चोरी करून आणून ठेवला असल्याची बातमी मिळाली, त्यानुसार वरील ठिकाणी छापा मारून या इसमास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील प्रत्येकी 15 किलो वजनाचे 63 बॉक्स व खजुराचे 70 बॉक्स, एक डेल कंपनीचा सीपीयू, एक हिकविजन कंपनीचा डीव्हीआर, एक होंडा कंपनीची सी आर वी गाडी, एक लोखंडी कटावणी असा एकूण सात लाख 13 हजार चारशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड ,सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे, संदीप गुरव, संदीप पाटील, संकेत मगदूम, हेमंतकुमार ओमासे, अनिल कोळेकर, संदीप नलवडे, सागर टिंगरे, सचिन धोत्रे, संतोष गळवे, प्रशांत माळी, आणि शुभांगी मुळीक आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here