सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी वेलणकर अनाथ आश्रम, बाल निरीक्षण गृह तसेच भगिनी निवेदिता प्रतिष्ठान मधील मुलामुलींना दिवाळीनिमित्त दिले नवीन कपडे भेट…

सांगली – ज्योती मोरे

सलग दोन वर्ष कोरोना आणि महापुराने दिवाळीच्या आनंदावर विरजण टाकले होते. यंदा कोरोना माघार घेत असताना दिवाळीतही उत्साह दिसत आहे. या हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठ्या आनंद पर्वात अनाथांच्याही जीवनात दिवाळीचा आनंद निर्माण होण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी सामाजिक बांधिलकी समजून उद्योगरत्न वि. रा. वेलणकर अनाथ आश्रम,

कै. दादूकाका भिडे मुलांचे निरीक्षण गृह व बालगृह तसेच भगिनी निवेदिता प्रतिष्ठान येथील सर्व मुला-मुलींना दीपावली निमित्त नवीन कपडे देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे प्रवक्ते मुन्ना कुरणे जेष्ठ नेते श्रीकांततात्या शिंदे, नगरसेवक राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, नगरसेवक रणजीत सावर्डेकर, नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकळे आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचे विश्वजीत पाटील,

कुपवाड मंडल अध्यक्ष रविंद्र सदामते, सुभाष गडदे, युवा प्रदेश सदस्य चेतन माडगुळकर, मयूर माडगुळकर, सुजित राऊत. गणपती साळुंखे, जितेंद्र मुळे, आनंद चिकोडे, भाऊ माळी, गौस पठाण, श्रीधर घोरपडे, अजित वाले, शोभाताई बिकड, शकुंतला काशीद तसेच डुबल मॅडम, कुलकर्णी सर काझी मॅडम आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here