सांगली कॉँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात जणजागरण अभियान संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

सांगली जिल्हा कॉंग्रेसच्या वतीनं,केंद्रातील भाजप सरकारनं, कृत्रिमरित्या वाढवलेल्या महागाई विरोधात आज सांगली ते हरिपूर दरम्यान रॅली काढून जनजागरण अभियान राबवण्यात आलं.

भाजप सरकारनं पेट्रोल, डिझेल, गॅस,आणि खाद्यतेल या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्यानं, सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्कील झालंय. त्या विरोधात असंतोष व्यक्त करण्यासाठी हे जनजागरण अभियान राबवत आहोत. अशी प्रतिक्रिया सांगली जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक संजय बालगुडे यांनी व्यक्त केलीय.

शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. दरम्यान काँग्रेसने साठ वर्षात काय केलं? हे विचारणाऱ्या भाजपनं सात वर्षात देश देशोधडीला लावलाय. याला मोदी- शहा जोडी जबाबदार असल्याची प्रतिक्रिया, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलीय.

यावेळी ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, नगरसेवक आणि सांगली जिल्ह्यातील महिला युवक, एन एस यू आय, सेवा दलातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅली नंतर हरिपूर मध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here