बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीत बोंब मारो आंदोलन…

सांगली – ज्योती मोरे

बांधकाम कामगारांचे विविध प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा कामगार आघाडीच्या वतीने बोंब मारो आंदोलन करण्यात आले. विश्रामबाग पासून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

बऱ्याच महिन्यांपासून बांधकाम कामगारांचे प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. मागील एक वर्षापासून कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने करोडो रुपये खर्च करुन ऑनलाईन प्रक्रियेमुळे कामगारांचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक होत आहे.

त्यामुळे मागील वर्षभरापासून प्रलंबित असलेले जुने ऑफलाईन अर्ज तसेच नवीन ऑनलाईन अर्ज तातडीने निकालात काढावेत अशी बांधकाम कामगारांची प्रमुख मागणी आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. यासह अन्य विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी भाजपा कामगार आघाडीच्या वतीने विश्रामबागपासून कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यामध्ये मोठ्या संख्येने बांधकाम कामगार सहभागी झाले होते. मोर्चा कार्यालयासमोर आल्यावर आंदोलकांनी रस्त्यातच ठिय्या मारला. तसेच राज्य शासनाच्या विरोधात बोंब मारुन आपला निषेध व्यक्त केला.आंदोलनाचे नेतृत्व कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, उपाध्यक्ष अमित कदम, माजी आमदार नितीन शिंदे, अविनाश मोहिते, आदींनी केले. याप्रसंगी उपस्थितांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

आघाडीच्या शिष्टमंडळाच्या वतीने सहा. कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले. बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये द्यावेत, पाच हजार रुपये दीपावली बोनस मिळावा, घरकुलाचे अर्ज तातडीने निकाली काढावेत, ऑनलाईन स्कॉलरशीपचे अर्ज मंजूर करावेत, कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना टॅब कि

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here