सांगली विधानसभा क्षेत्रात सांगली विधानसभा शिवसेनेचे संपर्क अभियान व सदस्य नोंदणी…

सांगली – ज्योती मोरे

मतदारसंघातील खोतवाडी, वाजेगाव, बिसुर, माधवनगर, हरिपूर, बामणोली, अंकली, इनाम धामणी या गावांमध्ये संपर्क अभियान आणि शिवसेना सदस्य नोंदणी राबविण्यात आली.यावेळी सांगली विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख अशोक साळवी साहेब,

जिल्हा संघटक बजरंगभाऊ पाटील, तालुका प्रमुख गजानन मोरे, सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख नानासाहेब शिंदे आणि वरील गावातील शिवसेना पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिक व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होती.

ग्रामीण भागामध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेसाहेब यांच्या कार्यपद्धतीवर जनसामान्यांनी मोठा विश्वास व्यक्त करीत येणाऱ्या लोकसभा,विधानसभा जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणूकिमध्ये शिवसेनेच्या मागे सर्वती ताकद उभा करून गावामध्ये शिवसैनिकांची संख्या वाढवून सांगली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या मागे ठाम उभे राहणार असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here