विभागीय उपक्रमशील शिक्षक क्रांती पुरस्काराने संदीप शेवलकार सर सन्मानित…

पातुर – निशांत गवई

पातुर येथील रहिवासी व श्री स्वामी विवेकानंद विद्यालय, हाता ता.बाळापूर येथे कार्यरत कलाशिक्षक श्री संदीप देवानंद शेवलकार यांना नुकताच श्री नटराज शिक्षण संस्था, वाटखेड तेल्हारा तथा महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य व अकोट येथील दांदळे कोचिंग क्लासेसच्या वतीने उपक्रमशील शिक्षक क्रांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अमरावती विभागातील सामाजिक शैक्षणिक , वैद्यकीय व पत्रकारिता या क्षेत्रात कोवीड काळात योगदान दिल्याबद्दल पत्रकार समाजसेवक व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल श्री संदीप शेवलकार यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व उपक्रमशील शिक्षक क्रांती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.अभय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सत्यपाल महाराज चिंचोळकर , राष्ट्रीय कीर्तनकार, हरीश गुरव नायाब तहसीलदार अकोट ,राजेश गुरव ,तहसीलदार तेल्हारा पंकज ढेंबरे, विभागीय अध्यक्ष अमरावती, उमेश म्हसाये संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला परिसरातील समाजसेवक पत्रकार व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here