संभाजी ब्रिगेड जुने गाव चिखलीच्या शाखेचे अनावरण संपन्न…

रविवार दिनांक ४ जुलै २०२१ रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव शिवश्री सौरभदादा खेडेकर यांच्या शुभ हस्ते संभाजी ब्रिगेड च्या जुने गाव चिखलीच्या शाखेचे अनावरण करण्यात आले.

संभाजी ब्रिगेड राष्ट्राला समर्पित कॅडरबेस असे संघटन आहे ,व्यवस्था परिवर्तन हा संभाजी ब्रिगेड चा श्वास आहे. या सामाजिक परिवर्तनाचा धागा होत चिखली तालुका व शहरांमध्ये अनेक युवक संघटनेमध्ये शामिल होऊन गाव तिथे शाखा उभारून संघटना अधिक- अधिक मजबूत करत आहे. जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री विकास खंडागळे यांच्या नेतृत्वात हा युवकांचा झंजावात तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात वाढत जात आहे .

संभाजी ब्रिगेडचे चिखली शहर संघटक शिवश्री धनंजय देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जुन्या गावातील अनेक युवकांनी संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश घेऊन जुन्या गावातील शाखा गठित केली.या शाखेमध्ये संदेश कुडके शाखाध्यक्ष ऐश्वर्य पदवाड, शाखा उपाध्यक्ष शुभम ढवळे, शाखा सचिव रामेश्वर देशमुख कोषाध्यक्ष तसेच कृष्णा नानोटे ,अनिकेत पाटणे, शिवम पंडित, ओमकार जाधव,

योगेश साखरे यांची शाखा सदस्य म्हणून सर्वानुमते शिवश्री सौरभ दादा खेडेकर यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.यानंतर शिवश्री सौरभ दादा खेडेकर यांनी उपस्थित कार्यकर्ते यांना संबोधित करतांना नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संभाजी ब्रिगेड चे कार्यप्रणाली व विचार समजावून सांगितले.

या शाखांना अनावरणाच्या वेळी शिवश्री सौरभदादा खेडेकर, प्रदेश सचिव संभाजी ब्रिगेड मदन दहातोंडे जिल्हा सचिव ,विकास खंडागळे जिल्हा कार्याध्यक्ष, आकाश लंबे पाटील जिल्हा सचिव ,निलेश मोरे तालुकाध्यक्ष ,श्रावण भुसारी तालुका कार्याध्यक्ष ,संजय काकडे महाराज तालुका संघटक, शिव शंकर शेळके तालुका उपाध्यक्ष ,आदित्य झाल्टे शहराध्यक्ष ,धनंजय देशमुख शहर संघटक, सागर महाशब्दे शहराध्यक्ष का आघाडी ,देवराज सवडतकर शहर अध्यक्ष विद्यार्थी आघाडी ,महेश मापारी सोशल मीडिया प्रमुख चिखली ,तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here