नालासोपारा: ( धीरज घोलप)
नालासोपारा नागीनदास पाडा येथे सातत्याने रहीवाश्यांच्या असुविधे साठी प्रथम प्राधान्य देणारी संघटना म्हणून नाव लौकिक आहे. ऐकून २१ इमारती संघटित होऊन प्रथम विभागातील रहिवाश्यांच्या वयक्तिक वैद्यकीय व शैक्षणिक सुविधेला प्राधान्य देत आहे.
या काळात नगरसेवक, सभापती, आमदार यांच्या सहाय्याने इमारतींच्या इत्तर सुविधांवर भर देत एक वेगळे परिवर्तन या संघटनेने केल्याचे सांगितले जात आहे.तरी ७२ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त विभागातील इमारतींच्या आजूबाजूला असलेला कचरा सातत्याने सफाई करून कोरोना काळ ते आज पर्यंत येणाऱ्या विविध रोगराई पासून स्वच्छतेच्या माध्यमातून रक्षण करण्यात आले.
म्हणून या शुभ दिनी येथील वसई विरार महानगर पालिकेच्या दहा सफाई दूतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघा चे अध्यक्ष प्रकाश नाडकर तथा माजी. नगरसेवक किसन मामा बंडागळे, समाज सेवक संतोष कदम, खजिनदार सतेश कदम, बाळा नारकर, सल्हागार अनंत गोरीवले, निलेश भक्कम, मंगेश गोरीवले, तानाजी मोडक, सचिन चिपटे, संदेश गोरीवले, खेराडे साहेब , शिर्के साहेब , सकपाळ साहेब, गुरव साहेब, पांडुरंग शेलार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला.