अंधार सावंगी, पांढुर्णा, गावंडगाव ग्रामपंचायतने केला आमचाच गाव आमचाच विकास, भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची सहदेव पजई यांची मागणी…

पातूर – निशांत गवई

शासन प्रत्येक गावांचा विकास होण्याकरिता विविध योजना च्या माध्यमातून विकास निधी देत असते परंतु या निधींचा ग्रामीण भागातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विकास न करता या विकास निधी मध्ये भ्रष्टाचार करीत आमचाच गाव आमचाच विकास हेच धोरण राबविण्याचा प्रयत्न केल्याचे,

पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या डोंगरी भागातील अंधार सावंगी, पांढुर्णा, गावंडगाव या ग्रामपंचायतींनी केल्याची तक्रार विवरा येथील सहदेव पजई यांनी केली असून या तक्रारीच्या अनुषंगाने गट विकास अधिकारी पंचायत समिती पातुर यांना चौकशी व अहवाल सादर करणेबाबत, सभापती लक्ष्मीबाई डाखोरे व शिवसेना गटनेते अजय ढोणे यांना निर्देश दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,अंधार सावंगी, पांढुर्णा, गावंडगाव या ग्रामपंचायत ला 14 वा वित्त आयोग अर्थात आमचा गाव आमचा विकास या निधीअंतर्गत विविध विकास कामे करण्याकरिता निधी प्राप्त झाला होता परंतु सदर ग्रामपंचायतींनी कोणताही कृती आराखडा आखलेला नसून,

याबाबत कोणत्याही स्वरूपाची माहिती वा ई-टेंडरिंग केले नसल्याचे स्पष्ट होत असल्याने या निधी मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला असून या निधी बाबत तात्काळ चौकशी करण्यात येऊन कारवाई करण्याची मागणी सहदेव पजई यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती पातुर तसेच पातुर पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मीबाई डाखोरे व शिवसेना गट नेते अजय ढोणे यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here