अनाधिकृत व धोकादायक बांधकामाला “एस” वार्ड सहाय्यक आयुक्त देत आहे संरक्षण…

बांधकाम पडल्यास जीवीत हाणी होण्याची मोठी शक्यता…

धीरज घोलप

मुंबई च्या आय आय टी पवई येथील चैतन्य नगर येथे मोठ्या प्रमाणात अनाधिकृत व धोकादायक तीन मजली बांधकाम चालू आहे.हे बांधकाम रस्त्याच्या कडेला चालू असल्यामुळे जर का हे बांधकाम पडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे.

या बांधकामा बाबत विभागातील काही जेष्ठ नागरीकांनी वारंवार तक्रार केली मात्र त्या जेष्ठ नागरीकांना सहाय्यक आयुक्त “एस” वार्ड यांना भेटायला तयार नाही या जेष्ठ नागरीक सहाय्यक आयुक्त भेटण्यासाठी चार चार तास त्यांच्या कार्यालया बाहेर थांबलेले असतात.

महत्वाचे म्हणजे हे बांधकाम पवई आय आय टी मार्केट मध्ये आहे.फक्त 600 sq.ft च्या क्षेत्रफळा मध्ये तीन मजली चे धोकादायक बांधकाम चालु आहे.सहाय्यक आयुक्त “एस” वार्ड सामान्य जनतेला भेटण्यास नेहमी टाळा टाळ करत असतात.मग समोरील व्यक्ती तरूण असो की जेष्ठ नागरीक असे हे सहाय्यक आयक्त सामान्य जनतेला भेटत नाही त्याच्या समस्याचे निवांरण करण्यात मदत करत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here