एस.टी. महामंडळ कर्मचारी बेमुद संपावर – सामाजिक कार्यकर्ता डॉ.चव्हाण यांची भेट…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ पासून तिरोडा आगारातील एस.टी. महामंडळाच्या कर्मचारी ह्यांनी एस.टी. महामंळाला राज्य शासनात विलीनिकरणासाठी बेमुदत संप पुकारला आहे.

याचा फटका मात्र प्रवाश्यांना बसणार आहे. नुकतेच दिवाळी सणाची सुरुवात झालेली आहे. सणासुदीच्या दिवसाला जिल्ह्यात, राज्यात नव्हे केंद्रात राहणारा कर्मचारी आपल्या जन्मभूमीत परत येऊन दिवाळी सण आपल्या कुटुंबातील परिजनास साजरा करीत असतो.

गावात, कुटुंब -समाज, गावकरी यांचे भेटी-गाठी घेऊन आपले स्नेहाचे संबंध यातून राखत असतो. याच मोक्याचे वेळ दळणवळनाचे मुख्य साधन एस.टी. महामंडळाकडे पाहिले जाते.

कोरोनाचे पाश्वभूमी असल्याने रेल्वे विभागाने संक्रमनाचे प्रादुर्भाव आणि सामान्य जनतेला विषाणूची बाधा लक्षात घेता काही प्रमाणात निर्बंध कायम राखून अटी, शर्थी, नियमांचे पालनाची शास्ती राखली असल्याने बहुतेक प्रवासी नागरिकांनी बस प्रवास निवडला आहे.

आता एस.टी. कर्मचारी ह्यानी बेमुदत संपाचे हत्यार उपसले असल्याने घराकडे परतणाऱ्या प्रवासी नागरिकांना मोठ्या अडचणीत आणले आहे.एस.टी. कर्मचारी आणि प्रवासी नागरिक यांचा समस्या जाणून घेण्यासाठी मुंडीकोटा येथील सामाजिक कार्यकर्ता तथा डॉ गोवर्धन चव्हाण ह्यांनी संपकरी स्थळाला जातीने भेट दिले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ता डॉ. चव्हाण ह्यांनी कर्मचारी ह्यांच्या समश्यांचा ऐकून घेतला. या समस्या निवारणासाठी राष्ट्रवादी पक्षाचे होतकरू, युवा तडफदार रविकांत (गुड्डू) बोपचे, माजी विधान परिषद आमदार राजेंद्र जैन, सर्वांचे लाडके नेते भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे राज्यसभा खासदार, प्रफुल पटेल यांना विषय समजावून सांगून तोडगा काढण्याचे प्रयत्न करणार असे अभिवचन संपकरी आणि प्रवासी नागरिकांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here