तिरोडा येथे एस. टी. कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपला आंदोलन स्थळी जाऊन…

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी खासदार डॉ. खुशालचंद्र बोपचे यांनी भेट दिली व पाठिंबा दिला…!

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या वतीने तिरोडा आगार च्या समोर सुरु असलेल्या बेमुदत आंदोलन स्थळी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी खासदार डॉ. खुशालचंद्र बोपचे यांनी भेट दिली व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात चर्चा केली.

कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या मागण्या रास्त असुन त्यांच्या या आंदोलनाला माजी खासदार डॉ. खुशालचंद्र बोपचे यांनी पाठिंबा दर्शविला. त्यांच्या मागण्यांकरिता आपणास खासदार प्रफुल पटेल, संबंधित परिवहन मंत्री व शासन दरबारी पाठवुरवा करणार असल्याचे यावेळी उपस्थित आंदोलक कर्मचारी यांना आश्वासित केले. यावेळी मोठ्या प्रमाणात राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारीसह पत्रकार महोदय व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here