राजगुरूनगर ( पुणे ) : पुणे जिल्हा कोरोनाचा हॉट स्पॉट होत असताना अनेक पत्रकारांना कोव्हिडं सेंटरला राखीव बेड उपलब्ध नसतात हा विषय मांडत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोव्हिडं सेंटरमध्ये राखीव कोटा असावा अशी नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट या संघटनेची मागणी केली आहे.याबाबतचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,कामगार मंत्री दिलीप वळसे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट पदाधिकारी पुणे ग्रामीणचे सदस्य रोहिदास गाडगे(Etv भारत),खेड तालुका अध्यक्ष सुनील थिगळे(जय महाराष्ट्र),जिल्हा कार्याध्यक्ष रायचंद शिंदे(News 18 लोकमत) उपस्थित होते.
पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यापुढे सर्व पत्रकारांना किंवा त्यांचा कुटुंबियांना राखीव बेड उपलब्ध असतील असा शब्द दिला आहे.याबद्दल nujm च्या राज्य अध्यक्ष शीतल करदेकर यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांचे संघटनेच्या वतीने आभार मानले.