दर्यापूर शहरामध्ये बिना मास्क फिरणाऱ्या कडून १६ हजार रुपये दंड वसूल.प्रशासनाची दंडात्मक कार्यवाही…

दर्यापूर :- किरण होले

अमरावती जिल्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. प्रसंगी दंडात्मक कारवाई सुद्धा केल्या जाते तरीही काही नागरिक बिनधास्त वावरत असल्याने त्यांच्या विरोधात दर्यापूर प्रशासनाच्या वतीने कारवाई करणे सुरू केलेले आहे.

ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहे. नागरीकांनी मास्क बांधणे, सोशल डिस्टन्सीग ठेवणे गरजेचे आहे याबाबत प्रशासन वेळोवेळी नागरीकांना सूचित करीत आहे. तरीही दर्यापूर शहरातील बरेच नागरिक चेहऱ्यावर मास्क बांधत नाही त्यामुळे परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

यावर प्रतिबंध असावा म्हणून दर्यापूर पोलीस स्टेशन व नगर परिषदेच्या वतीने दि. १८ ला दुपारच्या सुमारास मुख्य चौकातून बिना मास्क फिरणाऱ्या नागरीकांना समज दिली तर काही व्यापाराकडून दंड सुद्धा वसूल केला.

यावेळी मास्क न वापरण्याचे ३१ केसेस ९८०० दंड, सोशल डिस्टन्सीग न पाळणारे २ केसेस ६००० दंड व एकूण अंदाजे १६ हजार रुपये दंड आकरण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिक खरेदी करण्याकरीता किंवा इतर कामाकरिता दर्यापूर मध्ये येतात परंतु यातील बरेच नागरिक तोंडाला मास्क बांधत नाही किंवा सोशल डिस्टन्सीग सुद्धा ठेवत नाही.

त्यामुळे कोरोना पसरण्याची भीती निर्माण झालेली आहे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता यावी याकरिता दर्यापूरच्या मुख्याधिकारी गीता वंजारी, ठाणेदार प्रमेश आत्राम, तहसीलदार योगेश देशमुख यांनी आपल्या चमुसह मुख्य चौकात तसेच बाजारपेठेत जाऊन व्यापारी व नागरीकांना समज दिली व दंड वसूल केला. नागरीकांनी त्रीसूत्रीचा अवलंब करावा असे आव्हान यावेळी करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here