तावडे हॉटेल येथे आर.पी.आयचा.(आ)रास्तारोको…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

बांधकाम कामगाराच्या प्रलंबित मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) कामगार आघाडीच्या नेतु्त्वाखाली बांधकाम कामगारांनी राज्यांचे बांधकाम मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निषेधाच्या घोषणां देत तावडे हॉटेलजवळील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केला.

आदोलकना पोलिसांनी हाटवल्यानंतर कोल्हापूरकडे जाणार रस्ता आंदोलकांनी तास ते दिड तास रस्ता रोकोन धरला गांधीनगर पोलिस व शाहुपुरी पोलिस यांच्यात हद्दीवरुन शाब्दिक चकमक सुरू झाली.

बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे आरोग्य मेडीकिलीम हि योजना प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी बांधकाम कामगाराच्या घरकुलासाठी स्वतंत्र योजना राबवावी मुलीच्या लग्नासाठी ५१ माजावर ऐवजी १००००० रुपये करण्यात यावी या आणि विविध मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) बांधकाम कामगार आघाडीच्या रस्ता रोकोचा इशारा दिला होता.

या सर्व मागण्या येत्या १५ दिवसत मार्गीलावाव्यात अन्यथा पुन्हा आंदोलनाची मार्गाने सरकारला जागे करु हे आंदोलन बांधकाम कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटीळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्या मोठी झटापट झाली.

यावेळी प्रदिप मस्के अशोक कांबळे कूष्णात लोखंडे रविंद्र पाटील पांडुरंग चव्हाण गणपती कांबळे शरद कांबळे खुदबुद्दीन नायकवडी बाळु सुतार महिलांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनासाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here