उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत निंबा फाटा येथे रुट मार्च…

अमोल साबळे

निंबा फाटा/बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या निंबाफाटा येथे उरळ पोलीस स्टेशन चे ठाणेदार अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शनाखाली निंबाफाटा येथे गणेश विसर्जना निमित्त रुट मार्च काढण्यात आला.

उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या गावातील नागरिकांना आवाहन करण्यात आले कि गणेश विसर्जन करता वेळी कोणत्याही प्रकारची मिरवणुक किंवा ढोल तासे न वाजवता व अगदी साध्या व सोप्या शांततेत गणेश विसर्जन करावे असे उरळ पोलीस स्टेशन चे ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब यांनी नागरिकांना सांगितले.

रुट मार्च काढतांना प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब, राजेंद्र मोरे ( पि. एस. आय), राजाभाऊ बचे साहेब, किशोर पाटील , दिनकर इंगळे साहेब, नंदु सुलताने साहेब, घुगे साहेब, भोजने साहेब, प्रविण लाड साहेब, राजेंद्र राऊत साहेब, मुळे साहेब, इंगळे मॅडम व सर्व पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here