रोटरी क्लब ऑफ सांगली सिटीतर्फे आदर्श शिक्षकांचा गौरव…

सांगली – ज्योती मोरे

शिक्षकांचे अध्यापन काम दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे, असे मत अब्दुललाटच्या गुरुकुल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष गणेश नायकुडे यांनी येथे व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ सांगली सिटीच्या नेशन बिल्डर अवाॅर्ड वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर संजय सोनटक्के, असिस्टंट गव्हर्नर किशोर शहा यांची विशेष उपस्थिती होती.

रोटरीच्या शिक्षण उपक्रमांतर्गत आदर्शवत काम करणाऱ्या शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन गौरवण्यात येते. यंदा रोटरी क्लब ऑफ सांगली सिटीमार्फत दहा शिक्षकांना गौरविण्यात आले. सांगलीतील हुतात्मा स्मारक या ठिकाणी समारंभ झाला.

रोटरी क्लब ऑफ सांगली सिटीचे प्रेसिडेंट शशिकांत चौगुले यांनी स्वागत केले. अनुग्रहा दळवी हिने स्वागत गीत म्हटले. पाॅल हॅरीस व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. रोटरी लिटरसी कमिटी चेअरमन स्नेहल गौंडाजे यांनी नेशन बिल्डर अवार्डची माहिती दिली. अवाॅर्ड विजेत्या शिक्षकांचा परिचय करून दिला. महादेवी राजू लाटवडे (नवकृष्णा व्हॅली इंग्रजी माध्यम) प्रवीणकुमार विद्याधर खोत (म्हैसाळ), सतनामकौर अजितसिंग चड्डा (आशादीप स्कूल) ज्योती शंकर कांबळे (जिल्हा परिषद कानडवाडी शाळा), अस्मिता अमोल भोकरे (जिल्हा परिषद शाळा नंबर दोन कुपवाड), सुभाष गणपती गुरव (मुख्याध्यापक जि प शाळा नंबर 2 मौजे डिग्रज), सुनील बाळासाहेब चौगुले (नव कृष्णा व्हॅली स्कूल,विजय नगर), सुरेंद्र यशवंत ढोबळे (जिल्हापरिषद पाटगाव), दिलीप निवृत्ती वाघमोडे (जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मालगाव), व दयासागर बाबुराव बन्ने (जि प शाळा वानलेसवाडी) या शिक्षकांना श्री. नायकुडे , श्री. सोनटक्के, श्री शहा यांच्या हस्ते नेशन बिल्डर अवाॅर्ड प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी दयासागर बन्ने, ज्योती कांबळे या शिक्षकांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले.

रोटरीच्या आयडियल ॲपसहित टीच उपक्रमांची माहिती असिस्टंट गव्हर्नर सोनटक्के यांनी दिली. श्री. शहा यांनी रोटरी करत असलेल्या विविध सेवा उपक्रमांची माहिती शिक्षकांना दिली. यावेळी बोलताना श्री. नायकुडे म्हणाले, शिक्षकांचे काम दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. ज्ञानदानाशिवाय अन्य अशैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांचा वेळ जात असतो, तो टाळला पाहिजे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक प्रयत्न करतात, त्याची समाज दखल घेते रोटरीने निवडलेल्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्यावरून हे लक्षात येते.

सचिव प्रेमराज जाजू यांनी आभार मानले. यावेळी मंदार बन्नेे, रणजीत माळी यांच्यासह रोटरी सदस्यांनी नियोजन केले. सुरेश नरुटे, विकास चौगुले, अशोक परीट, सुषमा निंबाळकर, सुनिता भोसले, प्रकाश कांबळे, विनायक जोशी यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रोटरी क्लब ऑफ सांगली सिटीच्या नेशन बिल्डर अवॉर्ड वितरण समारंभात विजेत्या शिक्षकांसमवेत गणेश नायकुडे, किशोर शहा, संजय सोनटक्के, शशिकांत चौगुले व रोटरी सदस्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here