रस्ता बांधकामात बारब्रिक कंपनीकडुन अनियमीतता; जि.प. सदस्य डोंगरे मार्फत सदर प्रकार उघडकिस…

तक्रार केल्यावर उपअभियंत्याचे अपशब्दात बोलणे.

रामटेक – राजु कापसे

सध्या मनसर – तुमसर महामार्गाचे सिमेंटीकरणाचे काम धडाल्ल्याने सुरु आहे. मात्र कुठे कुठे रस्ता बांधकामात मोठी अनियमितता सुरु असुन नेमके याच कारणावरून काल दि. २० मार्चला जि.प. सदस्य सतीश डोंगरे यांचेसह कार्यकर्त्यांनी मनसर येथे सदर प्रकार उचलुन धरत संबंधीतांना खडसावले व आमच्या गाववस्तीतुन जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम योग्य प्रकारे करा असा दम दिला.

दरम्यान एन.एच.ए.आय. चे उपअभियंता गंगे यांना फोन करून जि.प. सदस्य डोंगरे यांनी घडत असलेला सदर प्रकार त्यांच्या कानावर टाकला असता त्यांनी साफ साफ नकार देत असे तिथे काहीही घडत नसल्याचे सांगत डोंगरे यांच्याशी अपशब्दात हुज्जत घातली.

मनसर – शितलवाडी जि.प. सर्कल चे सदस्य सतीश डोंगरे यांनी दिलेल्या माहीतीनुसार, बारब्रीक कंपनी द्वारे मनसर चौक ते राम मंदीर पर्यंत मनसर वरुन रामटेक कडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजुच्या रस्ताची १ मिटरपर्यंत खोदाई न करता फक्त डांबरी रस्त्या उखडवण्यात आला व त्यावर रोडरोलर फिरवुन गिट्टी ( टेक्नीकल भाषेत GSB ) टाकुन मासकाँक्रेट करण्याचे यावेळी षडयंत्रच जणु करण्यात आले होते.

मात्र कंपनीच्या या षडयंत्राला जि.प. सदस्य डोंगरे यांनी हाणुन पाडले व सदर प्रकारची माहिती एन.एच.ए.आय. चे वरीष्ठ अधिकारी नरेश बोरकर यांना दिली. या प्रकाराची दखल घेत त्यांनी मनसर येथील सदर स्थळाची पहाणी केली असता त्यांना सदर रस्ता बांधकामात अनियमीतता असल्याचे दिसुन आले.

यावेळी त्यांनी मातीचे सॅम्पल घेतले व संबंधीतांच्या काणउघाडण्या केल्या. यानंतर रात्री च्या सुमारास जवळपास १०० मिटरपर्यंत टाकलेली गिट्टी कंपनीकडुन उचलण्यात आली व रस्ता बांधकाम पुर्ववत योग्य प्रकारे करणे सुरु करण्यात आले मात्र राममंदीर ते चक्रधर स्वामी मंदीर पर्यंत मास काँक्रेट.चे काम रात्रीच्या सुमारासस उरकवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here