मिरज-कोल्हापूर रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पूलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात आर.पी.आय.(आ.) च्या वतीने रास्ता रोको…

वेळ पडल्यास जनकल्यानार्थ रेल रोको आंदोलन करणार- महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. विवेक कांबळे…

सांगली – ज्योती मोरे

मिरज-कोल्हापूर रेल्वे उड्डाण पूलाच्या निकृष्ठ दर्जाच्या डागडूजी कामासंदर्भात आर.पी.आय. सांगली शहर जिल्हा यांचे वतीने महा.प्रदेश सचिव मा. विवेक कांबळे साहेब, पश्चिम महा. प्रदेश सरचिटनीस जगन्नाथदादा ठोकळे, व युवक सांगली जिल्हाध्यक्ष. अशोक कांबळे , यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनाखाली भव्य रास्ता रोको आंदोलन करणेत आले.यावेळी आर.पी.आय.चे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,

राजेंद्र खरात, सांगली शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे, व्ही.जे.एन.टी. आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतिश जाधव, महिला सांगली जिल्हाध्यक्षा छाया सर्वदे, रोजगार आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष अरूण आठवले, मराठा आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, व्ही.जे.एन.टी.आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष . सुनिल माने, वकील आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष तुषार लोंढे, मिरज शहर अध्यक्ष मा. अविनाश कांबळे, मिरज तालूकाध्यक्ष अरविंद कांबळे,

आय.टी.सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, विशाल काटे उपस्थित होते.मिरज शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास. विवेकरावजी कांबळे साहेबांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरवात करणेत आली.यावेळी मोठ्यासंख्येने महिला,पुरूष,वृद्ध तरूण कार्यकर्ते रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांकडून बेजबाबदार प्रशासना विरूद्ध जोरदार घोषणाबाजी करणेत आली.यावेळी विवेकरावजी कांबळे साहेब म्हणाले,

आम्ही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते गेली सात ते आठ वर्षे झाली मिरज कोल्हापूर रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाची दुरूस्ती संदर्भात आंदोलन करत आहोत. प्रतेक वेळी प्रशासन सदर पुलाच्या कामाची कीरकोळ डागडूजी करत आहे. परंतू ठेकेदारामार्फत योग्य गुणवत्तेचे काम होत आहे का? हे पाहणी करणेसाठी कोणताच जबाबदार अधिकारी येथे येऊन तपासणी करताना दिसत नाही. पूला खालून रेल्वे मार्ग आहे. दररोज ५० ते ६० रेल्वे या पुला खालून जातात.

रेल्वे पूलाखालून जात असताना जोरदार पद्धतीने पूल हादरतो आहे. यामुळे पूलाचे संपूर्ण बांधकाम कमकूवत झाले आहेत. स्लेबचे तुकडे पडत आहेत. कोणतातरी मोठा अपघात होऊन मोठी जिवीत हानी होण्यापूर्वी संमंधीत जबाबादार विभागाने सदर पूलाच्या कामाची योग्यपद्धतीने दुरूस्ती करणे महत्वाचे आहे. याकरता रिपब्लिकन पक्ष वारंवार पाठपूरावा करत आहे.

परंतू कोणतेच विभागामार्फत सदरची समस्या गांभीर्याने घेतली जात नाही. म्हणून प्रशासनास जाग आणणेसाठी, सदर पुलाचे काम योग्यपद्धतीने होणे साठी आज रिपब्लिकन पक्ष रस्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करत आहे. तरी संमंधीत विभागामार्फत या आंदोलनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तसे न झालेस लवकरच या पुलाच्या कामासंदर्भात रेल रोको आंदोलन करू याची खबरदारी संमंधीत प्रशासकीय विभागाने घ्यायची आहे.

यावेळी निवेदनाची प्रत गांधी चौकी पोलिस ठाणे चे पोलिस निरीक्षक मा. फडणीस सो व मा. काळे सो यांना देऊन रास्ता रोको आंदोलन दि. १० नोव्हेंबर पर्यंत स्थगीत केले.यावेळी मिरज शहर उपाध्यक्ष मा. शानूरभाई पानवाले, जिल्हा उपाध्यक्ष मा. संजय मस्के,युवक सांगली जिल्हा-उपाध्यक्ष मा. हनमंत कांबळे, आय.टी.सेलचे मिरज शहर प्रभारी मा. पृथ्वीराज रांजणे,

सांगली शहर जिल्हा सचिव मा. नितेश वाघमारे, सांगली शहर जिल्हा सरचिटनीस मा. प्रभाकर नाईक, कुपवाड शहर अध्यक्ष मा. संतोष सर्वदे, मिरज शहर संघटक मा. हरीभाऊ सातपूते, व्ही.जे.एन.टी. आघाडीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष मा. मारूती धोतरे, आटपाडी तालुका सरचिटणीस धनंजय वाघमारे प्रवक्ते रणजीत ऐवळे विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष विवेक सावंत विशाल काटे गुलचंद भोरे, मा. अभिजीत चंदनशिवे, मा. संतोष कांबळे, मा. राहूल भोरे, मा. रंजीत कांबळे, यांचे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here