टाकळी बु ते चोहोट्टा बाजार रस्त्यावरील खड्डा देतोय अपघातास आमंत्रण…

टाकळी बु – कुशल भगत

टाकळी बु ते चोहोट्टा बाजार रस्त्यावरील चोहोट्टा बाजार जवळ भला मोठा खड्डा पडला आहे त्यामुळे वाहांनधारकांना ञास सहन करावा लागत आहे संबधीत विभागाने या खड्डयांची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे टाकळी बु ते चोहोट्टा बाजार मार्ग हा खुप वर्दळीचा मार्ग आहे.

या मार्गावर दिवसभरात वाहतुक सुरू असते या मुख्य मार्गावरील चोहोट्टा बाजार जवळ गेल्या कित्येक महिन्यांपासुन डांबर उखडुन भलामोठा खड्डा पडला आहे हा खड्डा दुचाकी व लाहानमोठ्या वाहनधारकांसाठी ञासदाय ठरत आहे या ठिकाणी खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनधारकांचे वाहनावरील नियंत्रण सुटत आहे या खड्डामुळे आज पंर्यत अनेक दुचाकीस्वार सायकलस्वार पडुन अपघात झाले आहेत.

या मार्गावरून सतत वाहनांची वर्दळ असल्याने राञीच्या सुमारास हा खड्डा वाहनधारकांच्या लक्षात न आल्यास फार मोठा अपघात होऊ शकतो गेल्या काही महीण्या आगोदर या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे माञ तरी टाकळी बु चोहोट्टा बाजार या मुख्य मार्गावर खड्डयांची मालीका सुरूच आहे.

तरी मुख्य मार्गावरील खड्डयांची दुरुस्ती संबधीत विभागाने करावी या चोहोट्टा बाजार जवळील खड्डयामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबधीत विभागाने खड्डा बुजविण्याची मागणी नागरिकांनी व प्रवाशांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here