पेट्रोल-डीझेलच्या किमतीत वाढ…जाणून घ्या

न्यूज डेस्क – देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा धक्का बसू लागला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली. यापूर्वी काल 4 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती.

तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात आज 19 पैशांनी आणि डिझेलमध्ये 21 पैसे प्रतिलिटर वाढ केली आहे. यापूर्वी 4 मे रोजी पेट्रोल 15 पैशांनी तर डिझेल 18 पैशांनी प्रतिलिटर महागले होते. अशाप्रकारे, गेल्या दोन दिवसात पेट्रोल 34 पैशांनी तर डिझेल 39 पैशांनी प्रतिलिटर महाग झाले आहे.

या वाढीसह दिल्लीत पेट्रोल 90 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 81.12 रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहे. दुसरीकडे मुंबईत पेट्रोलमध्ये प्रतिलिटर 17 पैसे आणि डिझेलमध्ये 21 पैशांनी वाढ झाली आहे. यानंतर दोन्ही इंधनांची किंमत अनुक्रमे 97.12 आणि 88.19 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here