रिपाइचा कागल आगाराच्या डेपो मॅनेजरला एस टी सुरू न करण्याचा दिला इशारा – उत्तम कांबळे…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

एस टी कर्मचारी यांचा गेले आणि एक दिवस संप चालू आहे हा संप रोजंदारी कर्मचारी यांना हाताशी धरून एस टी सुरू करण्याचा प्रयत्न कागलचे डेपो मॅनेजर यांनी चालू करण्याचा प्रयत्न केला पण हा प्रकार रिपब्लिकन पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे यांना माहिती मिळताच ते आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनसह कागल एस टी बस स्थानकात पोचले व समंधीत कर्मचाऱ्यांला एस टी पुन्हा आगारात परत घेऊन जाण्यास भाग पाडले,

डेपो मॅनेजरला सांगितले जो पर्यंत एस टी कर्मचारी यांचा सकारात्मक मार्ग निघुन संप मिटत नाही तोपर्यंत एस टी जिल्ह्यात रस्त्यावर दिसल्यास रस्त्यावर एक ही एस टी सुस्थितीत राहणार नाही याची सर्वस्व जबाबदारी ही डेपो मॅनेजर यांची राहिलं संप मोडित काढण्याचा प्रयत्न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाकडून जिल्ह्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला पोलिस प्रशासनासह कागल आगर आणि राज्य प्रशासनाला दिला.

यावेळी तालुकाध्यक्ष बाबासो कागलकर कार्याध्यक्ष बी.आर.कांबळे तालुका सचिव सचिन मोहिते मातंग आघाडी अध्यक्ष आण्णांप्पा आवळे जयवंत हळदीकर साताप्पा हेगडे तानाजी सोनाळकर निशिकांत कांबळे तसेच इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here