एसटी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने बेमुदत उपोषणाला रिपाईचा पाठिंबा :- जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने कागल एसटी डेपो येथे बेमुदत उपोषण सुरू आहे ही बातमी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे यांना समजताच त्यांनी तात्काळ उपोषणस्थळी भेट दिली व त्यांच्या न्यायिक मागण्या व अडचणी प्रत्यक्ष समजून घेतल्या यावेळी बोलताना उत्तम कांबळे म्हणाले की एसटी महामंडळाचे शासनात लवकरात लवकर विलीनीकरण झाले.

पाहिजे कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना सर्व सणासाठी 12500 उचल मिळाली पाहिजे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ठरलेल्या तारखेच नियमित वेतन मिळाले पाहिजे दिवाळी बोनस पंधरा हजार रुपये प्रमाणे मिळाला पाहिजे या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजेत व तसेच प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ठामपणे उभे राहणार असून त्यांच्या मागण्या शासन दरबारी पक्षाच्या वतीने मांडण्यात येतील असे आश्वासन एसटी कर्मचाऱ्यांना उत्तम कांबळे यांनी दिले,

मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) यांच्यावतीने एसटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा उत्तम कांबळे यांनी दिला यावेळी रिपब्लिकन पक्षाचे कागल तालुका सरचिटणीस सचिन मोहिते प्राध्यापक उदय नारकर कागल तालुका मातंग आघाडी अध्यक्ष साताप्पा हेगडे व महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here