भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर पंचतत्वात विलीन झाल्या. रविवारी सायंकाळी ७ वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जल, जमीन आणि हवाई दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजकारणी, बॉलीवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
लता मंगेशकर यांच्यावर भावाने अग्नी दिला, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले
लता मंगेशकर यांना त्यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी मंत्रोच्चार करताना अग्नी दिला. रविवारी सायंकाळी ७ वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बॉलीवूड सेलिब्रिटींसह राजकारणीही अंत्यदर्शनासाठी पोहोचले
पंतप्रधान मोदींनंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुपरस्टार शाहरुख खान आणि गायक शंकर महादेवन यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकारणीही पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे असे मोठे नेतेही उपस्थित होते. त्याचबोरबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील सुभाष देसाई हे मंत्रीही अंत्यस्काराला आलेले दिसून आले. राज ठाकरेही परिवारासह उपस्थित होते. फक्त राज्यातील मंत्रीच नाही तर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी हजेरी लावत आदरांजली वाहिली.