मधूबन रिक्षा मित्र मंडळ सांगली यांचे इंधन दरवाढी विरोधात एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी आंदोलन…

सांगली – ज्योती मोरे

काॅग्रेस भवन समोरील न्यु‌ ऑटोरिक्षा सांगली व योगीराणा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.गांधीगिरी आंदोलन करण्याचा उद्देश हा पॅट्रोल डिझेल व गॅस दरवाढ सरकारने केला आहे.तो केंद्र आणि राज्य सरकारने कमी करावा.रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे,रिक्षा चालक संतप्त होऊन बोलताहेत या केंद्र आणि राज्य सरकारने आम्हाला विष द्यावं.

काॅग्रेस च्या काळामध्ये १०० रीच्या वर कधीच इंधन दरवाढीचे आकडे गेलेले नव्हते.पण आज पॅट्रोल डिझेल आणि CNG गॅस यांचे दर आभाळाला भिडले आहेत.यामुळे रिक्षा,वडाप, टॅक्सी ड्रायव्हर यांच्यात प्रचंड नाराजी आहे.एवढी इंधन दरवाढ झाली आहे,की सामान्य नागरिकांना हे परवडू शकत नाही.मोदी सरकार ने ७० वर रेट असलेले पॅट्रोल डिझेल चे दर हळू हळू करत १०० च्या पुढे नेहून ठेवले आहेत.

यात सामान्य नागरिकांचे आणि रिक्षा चालकाचे हाल होत आहेत.मोदी सरकार ने तोंडावर बोट आणि मानेत बुकी अशी अवस्था करुन ठेवली आहे.यामुळे आज स्वप्नजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मधुबन रिक्षा मित्र मंडळ यांनी इंधन दरवाढ विरोधात एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी आंदोलन केले आहे.यावेळी संघटना अध्यक्ष प्रकाश चव्हाण, जयराम पुजारी,शुभम सकाले,अजित नाईक,सुभाष केसरे, गजानन सादंगी,जबर शेख,सय्यद शेख, सचिन जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here