कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी देवेंद्र फडणवीस…सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

न्यूज डेस्क – काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज ट्वीटर वर भाजपा कंगनाचा बोलविता धनी असल्याचा आरोप केला आहे. कंगना टीम म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” असून कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे असं ट्विट त्यांनी केलं आहे.

कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कंगना टीम म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” असून कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व आमची मुंबईवर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे”.

तर दुसर्या ट्वीट मध्ये “महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणीवपूर्वक अपमान भाजपा करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपाने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी,” अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here