बरोबर दिला नाही भात…म्हणून पाडले दोन दात…हदगाव तालुक्यातील गजानन बारमधील घटना

फोटो - सांकेतिक

महेंद्र गायकवाड
नांदेड
हदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील बिअरबार मध्ये जेवणाची सर्व्हिस बरोबर नाही तसेच राईस (भात) बरोबर दिला नाही म्हणून एकाचे दोन दात पाडून गंभीर दुखापत व आर्थिक नुकसान केल्या प्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हदगाव तालुक्यातील मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरखेड येथील गजानन बार अँड रेस्टॉरंटमध्ये 1 फेब्रुवारी रोजी 7 ते 9.30 च्या दरम्यान कांही जण बसले असता त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली व जेवणानंतर सर्व्हिस बरोबर नसल्याच्या कारणावरून व राईस(भात)बरोबर दिला नाही म्हणून बारमधील अनिल वाकोडे यास शिवीगाळ केली.

तसेच आरोपींनी आपल्या साथीदारास बोलावून बारमधील दारूच्या बाटल्या फोडत आर्थिक नुकसान केले. व अनिल वाकोडे यास लाकडाने गंभीर मारहाण करून दोन दात पाडले व जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी अनिल गणपतराव वाकोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनाठा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुरुन 18/2022 भादवी कायद्याप्रमाणे 326,324,427,323,504,506,34 कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.चव्हाण हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here