अमरावती | धाडसी महिला RFO दिपाली चव्हाण यांची गोळ्या झाडून आत्महत्या !…

धारणी – मेळघाट वन अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन श्रेत्रात कार्यरत परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवास स्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने वनविभागासह परिसरात एकच खळबळ उडाली. काल रात्री वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा, सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात.

हरिसाल येथील वनक्षेत्रात कार्यरत परिक्षेत्र अधिकारी दिपालीचव्हाण (२८) यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी छातीवर रिव्हाल्वरने गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. या घटनेने वनविभागासह जनमानसात एकच खळबळ असून अतिशय धाडसी अधिकारी म्हणून त्यांची वनखात्यात ओळख होती.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याच विभागातील वरिष्ठ अधिकारी त्यांना त्रास देत असल्याचे बोलले जात आहे. तर दीपाली या गर्भवती ह्या गर्भवती होत्या.

सदर घटना गुरूवार रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. धारणी तालुक्यातील हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्याशासकीयघरात दिपाली चव्हाणचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. घटना उघड झाल्यानंतर तब्बल दीडतास कोणालाच घरात प्रवेश करता आला नाही. तर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले होते. मृत्युपूर्वी लिहलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली असून लवकरच आत्महत्येच खर कारण कळू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here