सिईओंसह डिएफओं ची फुलझरी गावाला भेट, विविध समस्यांसह लसीकरणाचा घेतला आढावा…

रामटेक – राजु कापसे

रामटेक तालुक्याच्या आदिवासीबहुल भागातील तथा जंगल परीसराला लागुन असलेल्या फुलझरी पुनर्वसीत गावाला जि.प. मुख्यकार्यपालन अधिकारी श्री. योगेश कुंभेजकर तथा डिएफओ यांनी काल दि. २६ जुन ला भेट दिली.

दरम्यान तेथील लोकांशी अडीअडचन बाबत चर्चा केली व गावातील लोकांना मूलभूत सुविधा कशा उपलब्ध करुन देता येईल याबाबत उपस्थित अधिकारी वर्ग व नागरिकांना तथा ग्रामपंचायत प्रशाषणाला समन्वयाने कामे करण्यासाठी व योग्य नियोजन सादर करणेसाठी सूचना यावेळी केल्या.

यासोबतच तालुक्यातील संग्रामपूर, पुसदा – २, बेलदा, हिवरा बाजार व करवाही प्राथ.आरोग्य केंद्रांना भेटी देऊन आरोग्य व लस्सीकरण बाबत आढावा घेतला. काही ठिकाणी शिक्षकांना कामात सुधारणा बाबत ताकीद दिली तर काही ठिकाणी आरोग्य विभाग कर्मचारी वर्ग करीत असलेल्या चुका सुधारून सांगितल्या. बेलदा आश्रम शाळा , करवाही प्रा.आ.केंद्र येथे वृक्षारोपण केले व उपस्थितांना जिल्हा प्रशासन चे वतीने तयार केलेल्या ९ प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडीओ बाबत व तिसरी लाट,

लस्सीकरण, कोरोना रोग, म्युकरमायकोसीस, लहान मुलांची काळ्जी, लस्सीकरण बाबत गैरसमज दूर करणेसाठी माहिती दिली. उपस्थित नागरिकांना, कर्मचारी वर्ग आशा अंग. सेविका बचत गट ग्रामपंचायत सदस्य सरपंच इत्यादींना यावेळी कोरोना व्हायरस रूप बदलून येतो त्यामुळे लस्सीकरनचं एक चांगला पर्याय आहे व या कोरोना रोगावर मात करण्याच्या दुष्टीकोणातुन मार्गदर्शन केले.

किरंगीसर्रा या अतिदुर्गम, दुर्गम आदिवासी बहुल गावांला सुद्धा सायंकाळच्या सुमारास भेट देऊन तेथील लोकांशी सवांद साधला, कला पथक माध्यमातून कोरोना व लस्सीकरण बाबतच्या कार्यक्रमास हजर राहून लोकांना महत्वाची माहिती दिली. लस्सीकरण केंद्रास भेट देऊन काही त्रास वैगरे तर झाला नाही ना अशी लोकांची आत्मीयतेने विचारपूस केली. तेथील बीना मास्क वावरत असलेल्या लोकांना मास्क वाटप केले.

अतिशय महत्वाची बाब म्हणजे श्री. कुंभेजकर यांनी लस घेण्यास टाळाटाळ, विलंब करीत असलेल्या तीन ग्राम रोजगार सेवक, एक , एक माजी सरपंच, उपसरपंच व काही सदस्य तथा कार्यालयीन कर्मचारी यांना आपल्या उपस्थिती मध्ये त्यांच्या सह फोटो काढून लस्सीकरण करुन घेतले तसेच लस्सीकरण केलेल्या सरपंच, सदस्य , रोजगार सेवक, कर्मचारी यांचे लस्सीकरण केल्या बद्दल पुष्प गुच्छ देऊन सिईओ यांनी अभिनंदन केले.

या लस्सीकरण मोहिमेत आज शनिवार सुट्टी असूनही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला व स्थानिक कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्या चांगल्या मेहनतीमुळे पहिल्यांदाच रामटेक तालुक्यात सद्या मागील तीन महिन्यापासून काहीच लस्सीकरण होत नव्हते पण आज नकारात्मक परिस्थितीतही विक्रमी म्हणजे एकूण 1471 नागरिकांनी लस्सीकरण करून घेतले हे येथे विशेष उल्लेखनीय.

आजच्या भेटीत दौरा वेळेस. जि.प. सदस्या शांता कुंभरे, राजेंद्र भुयार उप. मु. का. अ पंचायत, श्री अनिल किटे, श्री हेमके साहेब डि.एच.ओ. जि.प. नागपुर, प्रदीप बमनोटे गट विकास अधिकारी, अशोक खाडे बी डी ओ पारशिवनी, तालुका आरोग्य अधिकारी चेतन नाईकवार, डॉ. गुप्ता, रवींद्र कुंभरे सभापती रामटेक. सर्व सबंधित ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, सचिव, शिक्षक, आशा वर्कर अंग. सेविका, पंचायत समिती चे विस्तार अधिकारी, स्वच्छ भारत मिशन टीम, नरेगा ए.पी.ओ.हे सर्व यावेळी प्रामुख्याने हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here