सूडभावनेतून घडले भंडाऱ्यातील ‘ते’ हत्याकांड…खून प्रकरणी तिघांना अटक…डीबी पथकाने आवळल्या मुसक्या…

भंडारा : महिनाभरापूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी धारदार शस्त्राने वार करून एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना भंडारा शहरातील शुक्रवारी परिसरातील सुभाष वॉर्डात सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी मध्यरात्री तिघांना अटक केली.


◆ खून प्रकरणी भंडारा पोलिसांनी कुणाल चून्हे (२५), विशाल मोटघरे(२४) रा. शुक्रवारी वॉर्ड, मनिष मोटघरे (१९) रा. सहकार नगर या तिघांना मध्यरात्री अटक केले. आपसी वादातून झालेल्या मारहाणीचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती भंडारा पोलिसांनी दिली आहे. मृतक हा नागपूर येथील असून मागील काही दिवसांपूर्वी तो कामाच्या शोधात पत्नीसह भंडारा येथे रहायला आला होता.

शुक्रवारी परिसरात भाड्याचे घर घेऊन तो राहत असताना मागील महिन्यात मृतक सुरज यादव (३२) याचा या तिघांसोबत वाद झाल्याने या तिघांनाही मारहाण केली होती. याप्रकरणी मृतकाविरुद्ध भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मृतकाने केलेल्या मारहाणीमुळे त्याचा बदला घेण्याची खूणगाठ या तिघांनी मनात बांधली होती.


◆ सोमवारला मृतक हा शहरातून घराकडे जात होता. दरम्यान, हे तिघेही मृतक सुरजच्या मागावर होते. शुक्रवारी परिसरात हॉटेल विघ्नहर्ताजवळून पंढराबोडी मार्गाने मृतक एकटाच जात असल्याचे बघून तिघांनी त्याला वाटत अडविले. जुन्या मारहानिवरून वाद घालून काही कळायच्या आतच मृतकावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या सुरजचा मदतीपूर्वीच घटनास्थळी मृत्यू झाला.

याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जनबंधु, पोलीस निरीक्षक लोकेश काणसे यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे यांच्या पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखून काही तासातच आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, सर्वांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती भंडारा पोलिसांनी दिली.


◆ या खून प्रकरणी भंडारा पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून मध्यरात्री अटक केली. ही कारवाई डीबीचे पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे, पोलीस हवालदार ओमकार श्रीवास, बापूराव भुसावळे, पोलीस नायक प्रशांत भोंगाडे, साजन वाघमारे, पोलीस शिपाई संदीप बनसोड, अजय कुकडे, भेनाथ बुरडे आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here