हातगाव ग्रामपंचायत मारहाण प्रकरणी सुरेश जोगळे यांचा खुलासा…


हातगाव ग्रामपंचायत येथे महात्मा फुले जयंती निमित्य कार्यक्रमात मारहाण प्रकरणी सुरेश जोगळे यांनी आपली प्रतिक्रिया खुलासा करीत म्हणाले की, दिनांक 11 अप्रैल ला सकाळी हातगांव ग्रामपंचायत येथे अक्षय सुरेश जोगळे ग्रामपंचायत सदस्य तथा विरोधी गट नेता, सौ.ऊज्वला शिवदास राऊत, सौ.रंजना एकनाथ गोपकर, सदस्या, माजी सरपंच विजय राऊत, श्रीराम सोळंके , रमेश हेन्गड, जयनंदा गोपकर, हरिभाऊ जोगळे, प्रदीप डांगे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, सुरेश जोगळे, श्रीकृष्ण घाटे, माजी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी अजय गोपकर,दिनेश बोळे ,यांच्या उपस्थीत महापुरुष महात्मा जोतिबा फुले यांची जयंती ठीक 10 वाजता च्या सुमारात शांततेने पार पडली.

जयंतीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आम्ही सर्वच चाय पीत असतांना सरपंच अक्षय जितेंद्र राऊत व काही सदस्य पती सोबत सभागृहात जाऊन कर्मचाऱ्यांना सरपंच दमदाटी करीत होते की मी न येता जयंती कशी साजरी केली परंतु आम्ही त्याबद्दल कोणीही प्रतिक्रीया दिली नाही नंतर सरपंच यांनी दिग्विजय गाडेकर यांना फ़ोन करून बोलावले व ग्रामपंचायत मध्ये येत असतांना सरपंच च्या पहिले जयंती कशी साजरी केली असे बोलत असतांना अक्षय सुरेश जोगळे सदस्य यांनी त्यांना म्हटले की,

आम्ही आयोजीत केली सरपंच यांच्या निरोप ची वाट पहाली परतु सकाळी 9 वाजेपर्यंत कोणताही निरोप न आल्यामुळे आम्ही सोशल डीस्टनिंग चा विचार करून कमी लोकात जयंती साजरी केली परंतु दिग्विजय गाडेकर हे मधातच बोलल्याबद्दल अक्षय जोगळे यांच्या सोबत वाद झाला परंतू थोडक्यात आटोपला दोघेही पोलिस स्टेशन ला गेले तेथे मागून सरपंच अक्षय राऊत सोबत असलेले लोक सुध्दा पोलिस स्टेशन ला जाऊन पोलिसांसोबत वाद घातला.

मात्र तेथुन वापस येऊन ग्रामपंचायत ला सरपंच राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन खोट बोलुन महापुरुष यांची विटंबना केली अस खोट वक्तव्य केल आणि माझी समाजात बदलामी केली व पत्रकार यांनी सुध्दा कोणत्याही प्रकारची चौकशी न करता व कोणत्याही प्रकारची प्रतिक्रीया न घेता खोटी बातमी प्रसारित करून माझा अवमान केला.

दिग्विजय गाडेकर हा नेहमीच शेतकरी संघटना पदाधिकाऱ्याच्या व तालुक्यातील अधिकारी यांच्या सोबत उधटपणे अपमानित करणे,तक्रारी करणे तसेच ब्लँकमेल करणे हा त्याचा धंदा आहे तो आमदार साहेब यांचा माणुस व भारतीय जनता पार्टी चा कार्यकर्ता असल्यामुळे आजपर्यंत अधिकारी सहन करत आले . असे मला वाटते .
प्रसारित केलेल्या पत्रकार यांनी त्वरित सुधारित करून व सत्य मांडावे .

सुरेश जोगळे
जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना अकोला .
अक्षय सुरेश जोगळे
सदस्य ग्रामपंचायत हातगांव .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here