राजु कापसे
रामटेक
स्थानिक पंचायत समीती येथील विस्तार अधिकारी ( कृषी ) श्री प्रभाकरजी चन्ने काल दि. ३१ जाने. ला सेवानिवृतीपर सत्कार करण्यात आला. पं.स. रामटेक च्या शेतकरी भवनात सदर सत्कार कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.
पं.स. रामटेक येथील शेतकरी भवनात श्री प्रभाकरजी चन्ने विस्तार अधिकारी (कृषी)यांचे नियत वयोमानानुसार दिनांक ३१ जाने. रोजी वयाचे ५८ वर्ष पूर्ण झाल्यामुळे पं. स. रामटेक च्या वतीने सेवानिवृत्ती कार्यक्रम घेण्यात आला. श्री प्रभाकरजी चन्ने यांनी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ते विस्तार अधिकारी कृषी हि पदे भूषविली. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात त्यांची ख्याती होती. वरिष्ठानी सोपविलेल्या प्रत्येक विभागाची कामे यांनी सक्षमपणे पार पाडली.
सर्वाना सहकार्य करणे, सर्वाना सोबत घेऊन चालणे, या स्वभावामुळे प्रभाकरजी चन्ने सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मध्ये कर्तव्यशील अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. पंचायत समितीच्या वतीने यांचा सत्कार करून पुढील आयुष्य सुख, समाधानी, आरोग्यदायी जाण्याच्या सर्वानी या प्रसंगी शुभेच्या दिल्या.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. श्रीमती कलाताई ठाकरे सभापती प. स. रामटेक, प्रमुख उपस्थिती संदीप गोडशलवार गट विकास अधिकारी प. स. रामटेक, श्री. बंधाटे प. स. सदस्य, श्री होलगिरे माजी प. स. सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अनिलजी रामटेके विस्तार अधिकारी (पंचायत ) यांनी तर सूत्र संचालन श्री अनिलजी मडावी आणि आभार प्रदर्शन श्री. मते यांनी केले. या कार्यक्रमाला श्री धनराज खोरगे कृषी अधिकारी, श्री घोरपडे, कृषी वि. अ. श्रीमती लेंडे मॅडम, श्री जगणे वि. अ. सांख्यिकी, श्रीमती डॉ गडमाले मॅडम ओअशुधान विकास अधिकारी, प. स. चे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. उपस्थित सर्वानी श्री. प्रभाकरजी चन्ने यांना शुभेच्या दिल्या.