Thursday, November 30, 2023
Homeराज्यसेवानिवृत्त सैनिक महेंद्रसिंह चौहान यांचा देहदान संकल्प...

सेवानिवृत्त सैनिक महेंद्रसिंह चौहान यांचा देहदान संकल्प…

Spread the love

रामटेक – राजू कापसे

रामटेक तालुक्यातील परसोडा येथील रहिवासी व ६४ वर्षीय सेवानिवृत्त सैनिक महेंद्रसिंह विठ्ठलसिंह चौहान यांनी नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापनेचे औचित्य साधून १५ ऑक्टोबरला इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या अध्ययनासाठी मरणोपरांत देहदान संकल्प नोंदणी केली.

माजी सैनिक महेंद्रसिंह यांनी अनेक देशाची सेवा केली असल्याने देशप्रेमाची भावना व राष्ट्राप्रति समर्पणातून कुटुंबियांच्या संमतीने निर्णय घेत देशप्रेमाचा कृतिशील संदेश दिला.

यावेळी आकाशझेपचे फाउंडेशनचे सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी नोंदणी प्रक्रिया केली. माजी सैनिक महेंद्रसिंह यांचेपासून प्रेरणा घेऊन नागरिकांनी मरणोपरांत देहदान व अवयवदान करण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: