“सन्मान कर्तृत्वाचा, जागर स्त्री शक्तीचा” पोपट कुटुंबातील सौ नीता पोपट यांचा “एकत्रित कुटुंब पद्धती”…

यासाठी आ सौ श्वेताताई महाले यांच्या वतीने सन्मान…

कर्तृत्ववान नारीच्या सन्मानाच्या घटस्थापनेची पहिली माळ.


चिखली – सन्मान कर्तृत्वाचा , जागर स्त्री शक्तीचा आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीने चिखली विधानसभा मतदारसंघातील ज्या महिलांनी प्रेरणादायी कार्य केले त्यांचा या नवरात्रीत नऊ महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने चिखली शहरात एकत्रित कुटुंब पद्धतीची परंपरा अतिशय चांगल्या पद्धतीने जोपासणाऱ्या बिपीनचंद्र पोपट यांच्या चार भावांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या माळेतील सर्व मन्यांना एकत्रित ठेवणाऱ्या मेरूमणी सौ नीता बिपिनचंद्र पोपट यांचा आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी साडी चोळी, मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून सन्मान कर्तृत्वाचा, जागर स्त्री शक्तीचा या ” कर्तृत्ववान नारीचा सन्मानाच्या पहिल्या माळेची घटस्थापना केली.

” सन्मान कर्तृत्वाचा, जागर स्त्री शक्तीचा ” या सन्मानासाठी चिखली विधानसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान आ सौ श्वेताताई महाले यांच्या वतीने करण्यात येणार आहे.आज पहिल्या दिवशी एकत्रित पद्धती यासाठी सौ नीता बिपिनचंद्र पोपट यांचा सन्मान करताना सौ नीता पोपट अत्यंत भावुक झाल्या होत्या.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष पंडितदादा देशमुख , महिला आघाडी शहर प्रमुख सौ सुनीताताई भालेराव , सभापती सौ विमल ताई देव्हडे ,सौ अर्चनाताई खबूतरे , सौ ज्योती ढोकणे , सौ ज्योती तिडके , सौ मयुरी विध्वंस , सौ सुरेखा शिंदे , सौ ज्ञानेश्वरी केसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.जात्याच्या खुंट्याजवळ दाणे असतील तर त्याचा कधीच चुरा होत नाही.………पोपट कुटुंब

आमच्या एकत्र कुटुंबाला आशीर्वाद किंवा पुण्याई असेल तर ती आमच्या वाडवडिलांची. आमचे मोठे भाऊ बिपिनचंद्र पोपट हेच आमच्या रामकालीन कुटुंबव्यवस्थेचे खरे हक्कदार आहेत. जात्याच्या खुंट्याजवळ दाने असेल तर त्याचा कधीच चुरा होत नाही.

त्याप्रमाणे आमच्या कुटुंबाला खुंट्याजवळ ठेवण्याचं काम आमच्या सौ नीता पोपट यांनी केले असल्याचे सम्पूर्ण पोपट कुटुंब मोठ्या अभिमानाने सांगतात. चार भाऊ , त्यांच्या पत्नी चार सौ नीता, सौ वंदना, सौ गीता व सौ सारिका सख्या बहिणी सारख्या राहतात. त्यांचा एकमेकांवर इतका विश्वास आहे की एकीनं सांगितलं तेच ब्रीद वाक्य असते.

त्यांची मुलं पण इतके नशीबवान आहे की चार चार आयांचे संस्कार मिळाल्यामुळे त्यांचा त्यांना नक्कीच फायदा झाला आला आहे. एक इंजिनियर, दुसरा पीएचडी, तिसरी CA, चौथी एमबीबीएस डॉक्टर पाचवी आर्किटेक शिकत आहे. आणि हे सर्व चारही भावांच्या एकीमुळे शक्य झाले आहे.

प्रत्येक घरात भांड्यांचा आवाज तर होतोच पण तिथे वाद न होता संवादाने तो प्रश्न सुटतो हे सौ नीता पोपट यांचे खास वैशिष्ट्य. शक्तीची आई जगदंबा रूप घेऊन आमच्या घरात आल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती टिकणे शक्य झाले आहे.

आई रुपी आधार देणाऱ्या आमच्या मोठ्या ननंद बाई चंदाताई सुभाषचंद्र ठक्कर निजामबाद यांचा आमच्या एकत्र कुटुंब पद्धतीत फार मोठा सहभाग असल्याचे ही पोपट कुटुंब मोठया अभिमानाने सांगतात . त्यांच्या कुटुंबात आज 15 जण आहे.

पंधरा जणांसाठी एकच चूल पेटते . चार ही भाऊ एकत्रित बांधलेल्या मोळीप्रमाणे राहत असल्याने कुणीही त्यांच्यात फूट पाडू शकले नाही. त्यांचा परिवार असाच मोठा होत राहून एकत्रितच नांदो या शुभेच्छा या वेळी आ सौ श्वेताताई महाले यांनी पोपट कुटुंबियांना देऊन पोपट कुटुंबियांचा आदर्श सर्वानी घेण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

कमलेश पोपट , सौ वंदना पोपट, सुनील पोपट , सौ गीता पोपट , अनिल पोपट सौ सारिका पोपट , श्रुती पोपट , वृंदा पोपट , धवल पोपट , मनन , पोपट किंजल पोपट ,आंचल पोपट व दिशा पोपट हे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here