खेड तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांसाठी राखीव बेड व उपचार सुविधा – प्रांताधिकारी संजय तेली…

राजगुरूनगर ( पुणे ) : खेड तालुक्यातील सर्व पत्रकारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राखीव बेड व त्वरित उपचार मिळावे यासाठी खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. प्रांताधिकारी संजय तेली यांनी मागणी मान्य केली असल्याची माहिती तालुका अध्यक्ष राजेंद्र लोथे यांनी दिली.

यावेळी तहसीलदार सुचित्रा आमले,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजय जोशी, आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे,पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र लोथे,दत्ता भालेराव,राजेंद्र सांडभोर, कोंडीभाऊ पाचारणे,अशोक कडलक,महिंद्रा शिंदे आदी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.

खेड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी सतत धावपळ करावी लागते.यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासाठी तालुक्यातील सर्व पत्रकार आणि जवळचे तथा फक्त कुटुंबातील सदस्य यांच्यासाठी कोरोना उपचार घेण्यासाठी आरक्षित बेड (उपचार सुविधा) देण्याची केलेली मागणी प्रांत अधिकारी संजय तेली मान्य केली असून,तालुक्यातील सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी आरक्षित बेड व उपचार सुविधा त्वरित देण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here