बिलोली तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर…आरक्षणात अंशतः बदल

बिलोली
रत्नाकर जाधव
■बिलोली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत करण्यात आली.यामध्ये पूर्वीच्या जाहीर झालेल्या आरक्षणात अंशतः बदल झाला असून तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती आरक्षित झाल्याने प्रस्थापितांना उपसरपंच पदावरच समाधान मानावे लागणार आहे.आज झालेल्या सोडतीत ५०% महिलांना आरक्षण देण्यात आल्याचे माहिती प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार कैलास वाघमारे यांनी यावेळी दिली.

◆तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत पंचायत समितीच्या सभागृहात प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा विद्यमान तहसीलदार कैलास वाघमारे यांनी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार आर.जे.चौहान,संजयगांधी योजनेचे नायब तहसीलदार परळीकर यांच्या उपस्थिती जाहीर केले.कु.सुप्रिया मार्तंड जेठे या बालिकेच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्या काढण्यात आल्या.आज झालेल्या आरक्षण सोडतीत  सरपंच पदासाठी ५०%  महिलांना आरक्षण देण्यात आले.विशेष म्हणजे जाहीर झालेल्या आरक्षणात अंशतः बदल झाला असून मौ.लघुळ सह आणखी चार ग्रामपंचायतीच्या सोडतीवर हरकती घेण्यात आल्या आहेत.

◆तालुक्यात जाहिर झालेल्या ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती (महिला) चिरली-टाकळी(थडी) गटग्रामपंचायत, बडुर, हिंगणी-दर्यापूर गट ग्रामपंचायत,पिंपळगाव(बु), आळंदी, खपराळा तर अनुसूचित जाती (पुरुष) साठी बोरगाव थडी, भोसी,बेळकोणी(बु), गुजरी, बावलगाव, कासराळी,तोरणा,अर्जापुर या ग्रामपंचायती तर अनुसूचित जमातीसाठी चार ग्रामपंचायती सुटल्या असून महिलांसाठी बोळेगाव, कार्ल (बु), तर पुरुषांसाठी थडी सावळी व डोनगाव(बु) आरक्षित झाले आहेत.विशेष मागासप्रवर्ग (ओबीसी) महिलांना कांगठी,शिंपाळ, खतगाव, कोटग्याळ-दौलपुर गट ग्रामपंचायत, गंजगाव, दगडापुर,आरळी, हज्जापुर, पोखर्णी, अटकळी तर पुरुषांसाठी कुंभारगाव, कोल्हेबोरगाव, डौर, सगरोळी,तळणी,कोंडलापूर-नागापूर-सुल्तानपुर

गट ग्रामपंचायत,येसगी, रामपूर थडी, केसराळी, किनाळा तर सर्वसाधारण गटाच्या महिलांसाठी हरनाळा, गागलेगाव, सावळी, हुनगुंदा, नागणी, लघुळ,बाभळी(आ), कार्ला(बु),मुतन्याळ, मिनकी, दौलतापूर,जिगळा, रुद्रापुर, केरुर,कामरसपल्ली,टाकळी(बु), लोहगाव तर सर्वसाधारण पुरुषांसाठी दुगाव,कोळगाव,कौठा, हरणाळी-ममदापुर गटग्रामपंचायत,माचनूर, चिंचाळा, हिप्परगा थडी, पाचपिंपळी या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.पूर्वीच्या आरक्षण सोडतीत डौर ग्रामपंचायत अनुसूचित जाती महिला तर चिरली-टाकळी ग्रामपंचायत सर्वसाधारण गटाला सुटली होती.या सोडतीत याठिकाणी अंशतः बदल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here