काटेपुर्णा नदीपात्रात वाहुन जाणाऱ्या बापलेकांना वाचविले…

फाईल फोटो

अकोला – पिंजर ते बार्शीटाकळी रोडवरील दोनद नजिकच्या पुलावरुन काटेपुर्णानदी पात्रात कारंजा येथील आपल्या तीन वर्षाच्या मुलासह वडीलांचा काटेपुर्णा नदीपात्रात तोल जाऊन नदीत कोसळले आणी पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊ लागले एवढयातच पुलापासुन 500 मी.अंतरावर वाहत गेल्यावर नदीच्या काठी झाडाला पकडत पकडत एका ठीकाणी थांबले.

आणी लगेच दोनद येथील नागरिकांनी नदीत उड्या मारून त्या दोघांनाही बापलेकांना सुखरुप बाहेर आणले यावेळी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार ठाकरे साहेब बिट जमादार सोळंके साहेब हे घटनास्थळी पोहचले होते. कारंजा येथुन पती पत्नी आणी आपल्या दोन वर्षाच्या मुलासह दुचाकीने अकोला येथे जात असतांना एवढ्यातच दोनद जवळील पुलावर काटेपुर्णा धरणाचे पाणी सोडल्याने नदी दुथडीभरुन वाहत आहे.

हे पाहण्यासाठी थांबले आणी यावेळी मुलाला आपल्या पोटाशी दुप्पट्याने बांधून असलेल्या परीस्थिती पाणी पाहत असतांना नदीत तोल गेला आणी दोघेही बापलेक वाहु लागले यावेळी उपस्थित नागरिकांनी आणी आईने आरडाओरडा केले तेव्हा लगेच दोनद येथील बहुसंख्य नागरीक धाऊन आले आणी नदीपात्रात उड्या घेऊन झाडाला पकडुन असलेल्या दोघांही बाप लेकांना सुखरुप बाहेर आणले.

या घटनेची माहिती दोनद येथील सागर कावरे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दीली होती लगेच रेस्क्यु टीम पिंजर बाहेर निघताच पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना ठाणेदार ठाकरे साहेबांचा फोन आला आणी दोघेही जिवंत आणी सुखरुप बाहेर काढले असे समजताच आंम्ही पोहोचायच्या अगोदरच तो पर्यंत बाहेर काढण्यात आले अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे..

लगेच ठाणेदार ठाकरे साहेब यांनी आपल्या वाहनात घेऊन पिंजर येथे आणले तेथे प्राथमिक उपचार करुन यावेळी दोघेही सुखरुप असल्याचे सांगितले येथुन लगेच नातेवाईकांनी आई सह दोघा बापलेकांना कारंजा येथे घेऊन गेले आज ईथे मात्र देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here