पती – पत्नीवर हल्ला करणाऱ्या जखमी वाघाचे केले रेस्क्यु…चोरबाहुली जंगल परीसरातील घटना

जखमी वाघासह पती – पत्नीवर उपचार सुरु

राजु कापसे
रामटेक

चोरबाहुली जंगल परीसरात तथा नागपुर – जबलपुर महामार्गावर लघुशंकेसाठी थांबलेल्या एका दाम्पत्यावर रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या जखमी वाघाने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना आज दि. २५ जानेवारीला सकाळ च्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्तानुसार आज दि. २५ जाने. ला सकाळच्या सुमारास मध्यप्रदेश येथील विमल दिनदयाल तिवारी हे आपल्या पत्नी व मुलासह जबलपुर कडुन नागपुर कडे जात असतांना चोरबाहुली जंगल परीसरात लघुशंकेच्या उद्देशाने आपले चारचाकी वाहन थांबवुन ते खाली उतरले. एवढ्यातच रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या जखमी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला व आधी पत्नीला तर नंतर पतीला जखमी केले.

दरम्यान यावेळी मुलाने एका काठीच्या साहाय्याने कोलाहल, आरडाओरड करून वाघाला हुसकावुन लावले. यानंतर टोल प्लाझा च्या वाहानाने जखमींना सुरुवातीला मनसर प्रा.आरोग्य केंद्रात तर नंतर नागपुरला हलविन्यात आले. तसेच वनविभागाने सुद्धा सदर प्रकरणाची तत्काळ दखल घेत आज दुपारच्या सुमारास सदर जखमी वाघाला रेस्क्यु करून त्याला सुद्धा नागपुरला उपचारासाठी पाठविले. वाघ दहा ते बारा वर्षाचा असुन एखाद्या अज्ञात वाहनाने त्याला धडक देवुन जखमी केले असेल असा कयास लावण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here