प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्रेलचा फॅशन डेमोक्रेझी सेल…

फॅशन्स आणि लाइफस्टाइल उत्पादनांवर ७० टक्क्यांपर्यंत आकर्षक सवलत…

मुंबई – निवड आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य साजरे करण्यासाठी भारताचा आघाडीचा लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या ट्रेलने आपल्या फॅशन डेमोक्रेझी सेलची घोषणा केली आहे. त्यातून सर्व फॅशन्स आणि लाइफस्टाइलवर ७० टक्क्यांपर्यंत आकर्षक सवलत दिली जाईल.

येत्या २० जानेवारीपासून सुरू होणारा फॅशन डेमोक्रेझी सेल ग्राहकांना हव्या असलेल्या वर्गवारीत जास्त व्हिडिओ पाहून जास्त सवलत मिळण्यासाठी उत्पादन वर्गवारी निवडण्यास मदत करेल – त्यामुळे हा लोकांसाठीचा, लोकांचा आणि लोकांनी तयार केलेला सेल ठरेल.

हा सेल वापरकर्त्यांना फक्त आकर्षक सवलतीच देत नाही तर एकात्मतेच्या शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकशाहीच्या भावनेचाही गौरव करतो. वापरकर्ते अ‍ॅपवर कोणत्याही साहित्याच्या वर्गवारीसाठी सर्वाधिक व्ह्यू गोळा करू शकतात आणि ट्रेल शॉपवर त्याच वर्गवारीत जास्तीत-जास्त सवलती मिळवू शकतात. या सेलदरम्यान सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म ट्रेलच्या वापरकर्त्यांनी पाहिलेल्या वर्गवारीवर अतिरिक्त सवलती देईल.

याद्वारे ट्रेलवर उपलब्ध असलेल्या भारतातील फॅशन आणि जीवनशैलीच्या वैविध्यपूर्णतेला अधोरेखित करणारी एक वेगळी संकल्पना असेल जसे, एथनिक डेमोक्रेझी, मिशन कॅशमेर, रंग दे बसंती, जश्न ए ग्रूमिंग, हेल्दी रिपब्लिक, माय कंट्री माय होम आणि युनिटी इन डायव्हर्सिटी.

फॅशन डेमोक्रेझी सेलमधून १०० दशलक्षपेक्षा अधिक वापरकर्त्यांना आपल्या आवडीची उत्पादने एथनिक आणि वेस्टर्न वेअरमध्ये १००० पेक्षा अधिक ब्रँड्सकडून खरेदी करता येतील आणि त्याचबरोबर सौंदर्य व वैयक्तिक काळजीतील उत्पादनेही घेता येतील. वापरकर्त्यांना लोरियल, लॅक्मे, बेवकूफ, पेपे जीन्स, स्पायकर, यूएस पोलो, फॅबएली, जुनिपर, कॅम्पस सूत्र आणि रेझिन अशा लोकप्रिय ब्रँड्सवर ७० टक्क्यांपर्यंत सवलती मिळवता येतील.

सर्वांत मोठा निर्मात्यांवर आधारित सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेला ट्रेल भारतीय फॅशनच्या वैविध्यपूर्णतेला अधोरेखित करेल, जिथे १८ दशलक्षपेक्षा अधिक साहित्य निर्माते या ७ दिवसांत १२ प्रादेशिक भाषांमध्ये आपली विशेष लाइफस्टाइल प्रदर्शित करतील.भारतात वॉचलिस्ट टू शॉपच्या संकल्पनेने प्रेरित झालेली ट्रेल भारताला फक्त प्लॅटफॉर्मवर माहितीपूर्ण साहित्य पाहून विद्यमान ऑफर्सपेक्षा अधिक सवलती देऊन सक्षमीकृत करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here