Republic Day | प्रचंड बर्फवृष्टीमध्ये इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या जवानांनी तिरंगा फडकवला…पाहा Video

फोटो -सौजन्य ANI

देश आज 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. काही तासांत राजपथ येथे परेड सुरू होईल. पण हा प्रजासत्ताक दिन देशासाठी खास आहे कारण अशा अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील, ज्या पहिल्यांदाच घडणार आहेत. कोरोना संसर्गादरम्यान साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ज्यांना दोन्ही लसी मिळाल्या आहेत त्यांनाच प्रवेश मिळेल. याशिवाय, कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असेल.

कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर २१ तोफांची सलामी देऊन तिरंगा फडकवला जाईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते परेडला सुरुवात होईल. त्यानंतर शौर्य पुरस्कार प्रदान केले जातील.

उत्तराखंडमध्ये उणे ३० अंश सेल्सिअस तापमान आणि प्रचंड बर्फवृष्टीमध्ये इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या जवानांनी तिरंगा फडकवला. भारत माता की जयच्या घोषणा दिल्या.

पाहा Video

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here