केंद्र शासनाने शेतकरी व कामगार विरोधी कायदे त्वरित रद्द करावेत…डॉ.गणेश कदम

अहमदपुर येथे कॉंग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

बालाजी तोरणे अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी

केंद्रशासनाने बहुमताच्या जोरावर शेतकरी व कामगार विषयक कायदे संसदेत मंजूर करून घेतले आहेत.हे कायदे शेतकरी व कामगार विरोधी आहेत.हे कायदे जर लागु झाले तर शेतकरी आणि कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे.त्यामुळे केंद्र शासनाने हे जुलमी कायदे तात्काळ रद्द करावेत,अशी मागणी अहमदपुर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ.गणेश कदम यांनी केली.

केंद्र शासनाने नुकत्याच मंजूर केलेल्या शेतकरी व कामगार विषयक कायद्याच्या विरोधात कॉंग्रेस पक्षातर्फे अहमदपुर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी बोलताना डॉ.कदम पुढे म्हणाले की, या कायद्या मध्ये शेतमालाला हमीभावाची खात्री नाही.शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाजार समित्याचे आस्तित्व धोक्यात येणार आहे.

करार पद्धती मुळे मोठे उद्योगपती शेतकऱ्यांची लुबाडणुक करण्याचा धोका आहे.कामगाराना नौकरीत कायम होता येणार नाही.हे कायदे लागु झाले तर शेतकरी आणि कामगार अडचणीत येतील.केन्द्र शासनाने हे जुलमी कायदे त्वरित रद्द नाही केल्यास कॉंग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला.

यावेळी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस सांब महाजन, जेष्ठ नेते भारत रेड्डी,माजी उपनगराध्यक्ष कलिमोद्दीन अहमद,युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष निलेश देशमुख,सिराजुद्दीन जहागीरदार,केदार काडवादे,शिवाजीराव जंगापल्ले,मन्नान शेख,आरिफ देशमुख यानीही आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन हंसराज सोमवंशी यानी केले.
विविध मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार श्री.मद्दे यांना देण्यात आले.

याप्रसंगी हेमंत माकणे,विकास महाजन,बाबासाहेब देशमुख,हंसराज सोमवंशी, प्रकाश ससाणे, शिवाजीराव जंगापल्ले,दिलीप कदम, बंडुपंत येरमे, रमेश मोगले, अनिल शेळके, प्रसाद जगताप, मारोती माने, दादासाहेब देशमुख, व्यंकटराव पाटील, अफरोज शेख, मोहम्मद पठाण, आसिफ देशमुख, सोमेश्वर कदम, राजेंद्र देशमुख, सुनिल वाघमार, ईसाक पटेल, ईमाम कुरेशी, रेणुकादास पांचाळ,अंतराम कदम आदी पदाधिकारी,शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here