मूर्तिजापूर ते हिरपूर रोडची त्वरित दुरस्ती करा; संताजी सेनेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन…

मूर्तिजापूर ते हिरपूर या रोडची अंत्यत दैयनिय अवस्था झालेली आहे. या रोडवर शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी, शेतकरी वर्ग यांची फार मोठया प्रमाणात वाहतूक चालू असते.परंतु पावसाळ्यामुळे या रोडवर मोठे मोठे खड्डे निर्माण झाले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरून जातांना कसरत करून जावे लागत आहे.या खड्ड्यामुळे अनेक किरकोळ अपघात घडलेले आहे.भविष्यात मोठा अपघात होऊ शकते.या अगोदरही ह्या रोड दुरस्ती करीता आंदोलने झालेली आहेत.

तरी कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली आहे सर्व खड्डे त्वरित बुजवण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावे जेणेकरून अपघात टळेल यावेळी संताजी सेना तालुकाध्यक्ष सुमित सोनोने,राहुल गुल्हाने,संताजी सेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अतुल नवघरे,निलेश सुखसोहळे,पुष्पक हांडे,गिरीश वनस्कार,अंकुश शिरभाते,अनिकेत गावंडे,स्वप्नील बनारसे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here