न्यूज डेस्क- अवघ्या राज्यातील राजकीय वातावरण तापवणारी रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता ज्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले होते. आता त्याच तक्रारदार महिलेने आता यू-टर्न मारत आपली तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्माने लेखी अर्ज देवून आपली तक्रार मागे घेतली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. पण पुन्हा ती तक्रार मागे घेण्यावरुन मागे फिरु नये म्हणजेच मी तक्रार मागे घेतली नाही असा दावा करू नये या करता पोलिसांनी तिला आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली असे ते प्रतिज्ञापत्र तिने मुंबई पोलिसांना दिले आहे.
“मी केलेली तक्रार काही कारणास्तव मी मागे घेत आहे” असं प्रतिज्ञपत्र रेणू शर्मा हिने पोलिसांना दिले आहे. तर या प्रकरणातील रेणू शर्माचे वकील यांनी 3 दिवसांपूर्वीच काही खाजगी कारण सांगत रेणू शर्माची केस त्यांनी सोडली होती. त्यानंतर आता रेणू शर्मानेच तक्रार मागे घेतली त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. 15 जानेवारीला रेणू शर्माने ट्विट करुन आपण तक्रारार मागे घेत असल्याचे सागंतिले होते.
या सगळ्या आरोपांवर स्वत: धनंजय मुंडे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं होते. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो, असं मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी बलात्काराचे आरोप खोडून काढले होते.
