डॉ.राजकुमार चव्हाण यांचा उपसंचालक पदाचा अतिरिक्त पदभार काढा…

अकोला – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण यांना आरोग्य उपसंचालक हे पद रिक्त झाल्याने अतिरिक्त प्रभार मिळाल्याने ते आरोग्य उपसंचालक पदी काही महिन्यांपूर्वी रुजु झाले. आरोग्य उपसंचालक बनल्यानंतर त्यांनी सर्वोपचार रुग्णालयातील आपल्या सी.एस कार्यालयाला पाय सुद्धा न ठेवल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

डॉ. चव्हाण यांच्याकडे आरोग्य उपसंचालक पदाचा पदभार आल्यानंतर त्यांना सी.एस पदाची जबाबदारी योग्य प्रकारे हाताळता येत नाही आहे. कोरोना काळात अकोल्यात सर्वोपचार रुग्णालयात दररोज भरती होणारे कोव्हीड रुग्ण तसेच अन्य आजारांकरिता भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड मोठी आहे.

असे असतांना वास्तविकतेत डॉ.राजकुमार चव्हाण उपसंचालक पदी विराजमान झाल्यापासून सर्वोपचार रुग्णालयात येणे विसरले आहेत. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयाचा कारभार ढेपाळला असुन त्याचा विपरित परिणाम रुग्णसेवेवर पडत आहे.

यामुळे डॉ.चव्हाण यांच्याकडील उपसंचालक पदाचा अतिरिक्त पदभार काढुन या ठिकाणी स्वतंत्र नेमणुक करण्यात यावी व रुग्णांना न्याय देण्यात यावा. जेणेकरून सर्वोपचार रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार पुन्हा सुरळीत होईल व रुग्णांची होणारी गैरसोय टाळता येईल. अश्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे व पालकमंत्री बच्चु कडु यांना दिले आहे.

डॉ.राजकुमार चव्हाण यांच्याकडे आरोग्य उपसंचालक पदाचा अतिरिक्त पदभार आल्यानंतर त्यांनी सर्वोपचार रुग्णालयातील सी.एस कार्यालयात येणेच बंद केल्याने येणाऱ्या रूग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डॉ.चव्हाण यांच्याकडे कोरोना नोडल ऑफिसर पदाचा पदभार असुनसुद्धा ते रुग्णालयात येत नाहीत हा प्रकार गंभीर असल्याने त्यांच्याकडील आरोग्य उपसंचालक पदाचा अतिरिक्त पदभार काढावा. आशिष सावळे (महानगराध्यक्ष महा.राज्य रुग्णसेवक संघटना)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here