मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना : सत्यपाल महाराज…

मुंडगाव येथे “सर्व धर्माची शिकवण एकच” कार्यक्रम संपन्न. अकोट ग्रामिण पोलिस स्टेशनचे आयोजन.

मुंडगाव – कुशल भगत

अकोला जिल्हा पोलिस दलाकडून विविध समाजोपयोगी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत,कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने “सर्व धर्माची शिकवण एकच” हा उपक्रम मुंडगाव येथील दहिभात सभागृहात संपन्न झाला.यावेळी पोलीस विभागाच्या उपक्रमाबाबत काढलेल्या रांगोळी कौतुकास्पद ठरली.

प्रत्येक धर्माची शिकवण एकच आहे, शांतता व जातीय सलोखा वृद्धिंगत व्हावा हा मुख्य उद्देश या उपक्रमाचा असून जातीय सलोखा टिकून राहावा प्रत्येक धर्माची शिकवण एकच असून ती प्रत्येकापर्यंत पोहोचावी याच उदात्त हेतूने आज अकोट ग्रामिण पोलीस स्टेशनने हा उपक्रम राबविला.

या कार्यक्रमाला अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे,सप्तखंजिरीवादक राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज,मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद युसूफ,शेख गुरुजी,फादर वेगस विशाल,ऋषीपाल महाराज,पोलीस पाटील संघटनेचे ऍड.गजानन पुंडकर,सुनिल फुरसुले,सरपंच श्रावण भरक्षे,पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर दहिभात,उपसरपंच तुषार पाचकोर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी केले,जगातील सर्वच धर्म मानसाने माणसाशी माणुसकीने वागावे, माणसाने मानवता जपावी आपल्या सतकार्याने माणूस मोठा होतो, प्रत्येकाने माणुसकी जपणे आज महत्त्वाचे आहे.

असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले,सूत्रसंचालन निलेश गाडगे व आभार प्रदर्शन विशाल बोरे यांनी केले यांनी केले यावेळी कार्यक्रमाला शांतता समितीचे सदस्य,पोलीस पाटील,पत्रकार बांधव व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here