अहमदपूर – बालाजी तोरणे
अध्यात्मिक क्षेत्रातील विज्ञाननिष्ठ राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना मुकलो अशा शब्दात शिवसेनेचे नेते मा.खा. चंद्रकांत खैरे यांनी भक्तीस्थळावर श्रध्दांजली अर्पण करताना मत व्यक्त केले.
सविस्तर माहिती अशी की,अध्यात्मिक क्षेत्रातील गुरु, विज्ञाननिष्ठ राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नुकतेच निधन झाले. त्यामूळे शिवसेनेचे नेते तथा मा. खा.चंद्रकांत खैरे यांनी भक्तीस्थळावर जाऊन महाराजांना श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी

जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, माजी जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, नगरसेवक विरभद्र गादगे,तालुकाप्रमुख विलास पवार, कृ.उ. बा.स.संचालक माऊली देवकत्ते, सुभाष गुंडिले, मन्मथ बोदले, नगरसेवक संदिप चौधरी, लक्ष्मण आलगुले, प्रविण डांगे, बालाजी काळे, शिवा कासले, राम जाधव, दत्ता पाचंगे, श्रीराम कदम, लक्ष्मण कदम, बाळू पडिले,
संग्राम टाले, विजय मुकनर, हेमंत शिंदे, बाळू भारकड, भाऊसाहेब मुळे, दत्ता कदम, अनिल ढोबळे, व्यंकट नलवाड आदिची उपस्थिती होती.पुढे बोलताना खैरे म्हणाले की, महाराजांनी लिगांयत धर्मासह इतर धर्मातील लोकांना सोबत घेऊन समाजहिताचे काम केले त्यांनी समाजहितासाठी आपले आयुष्य घालवले असून देशहितासाठी त्यांनी आपल्या प्रवचनातून भक्तांना मार्गदर्शन करत गेले असल्याचे खैरे यांनी बोलताना सांगितले.